नाश्ता राजाप्रमाणे, दुपारचे जेवण राजकुमारासारखे आणि रात्रीचे जेवण गरीबांसारखे करावे, असे म्हटलं जातं. या म्हणीनुसार आपण सकाळी जो नाश्ता करतो त्यात सर्व आवश्यक पोषक घटक असावेत. जेणेकरून ते खाल्ल्यानंतर तुम्ही दिवसभर सक्रिय राहता आणि निरोगीही. सकाळची सर्वात महत्वाची वेळ म्हणजे जेव्हा तुम्ही दिवसाचा पहिला घास खाणार असता. बरेच लोक रिकाम्या पोटी अनहेल्दीअन्नपदार्थ खातात, जे रिकाम्या पोटी खाणं योग्य नसतं.

त्यामुळे दिवसाची सुरुवात नेहमी अशा खाद्य पदार्थांपासून करावी, जेणेकरून तुमच्या शरीराला पूर्ण पोषण मिळू शकेल आणि विविध रोगांशी लढण्यासाठी प्रतिकारशक्तीही निर्माण होईल. जर मधुमेहाच्या रुग्णांबाबतीत बोलायचं म्हटलं तर सकाळचा नाश्ता त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. कारण डायबिटीजचा त्रास असलेल्या रुग्णांनी रिकाम्या पोटी काहीही खाल्ल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे अशा रुग्णांनी साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टींचे सेवन करायला हवं ते जाणून घेऊया.

रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टींचे सेवन करा –

तूप आणि हळद –

हेही वाचा- डायबेटिसच्या रुग्णांनी ऊसाचा रस प्यावा की नाही? जाणून घ्या याचे आणखी काही फायदे

एक चमचा गाईचे तूप आणि हळद मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. गाईच्या तुपात हळद मिसळून या मिश्रणाचे रिकाम्या पोटी सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. तूप मधुमेहाच्या रुग्णाला दिवसभर साखर खाण्यापासून दूर ठेवते. तर हळद जळजळ कमी करते.

दालचिनी

दालचिनी हा असा मसाला आहे, जो शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी ओळखला जातो. रात्री झोपण्यापूर्वी थोडी दालचिनी पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्याचे पाणी प्या. तुम्ही दालचिनीच्या पाण्याने हर्बल चहादेखील बनवू शकता.

भिजवलेले बदाम –

हेही वाचा- बदाम, चहासह ‘या’ ४ उपायांनी ब्लड शुगर झटक्यात नियंत्रणात येईल? रात्री झोपण्यापुर्वी ‘असे’ करा सेवन

तुम्हाला सकाळी उठल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही रिकाम्या पोटी थोडेसे प्रथिने घेऊ शकता. ज्यामध्ये भिजवलेले बदाम, अक्रोड किंवा फळांचा समावेश करु शकता.

आवळा रस आणि ऍपल सायडर –

१०० मिली पाण्यात सुमारे ३० मिली आवळ्याचा रस किंवा लिंबाचा रस एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर घाला आणि रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

मेथीचे पाणी –

मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी सर्वात आधी मेथीचे पाणी प्यावे. यासाठी एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी मेथीदाणे खा आणि उरलेले पाणी पिऊन टाका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)