Kitchen Jugaad Video: आपल्या देशात साजऱ्या होणाऱ्या सणांपैकी दिवाळी हा सर्वांत मोठा सण आहे. दिवाळीचा सण अगदी उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. दिवाळी हा रोषणाईचा सण असल्याने आपण त्या कालावधीत घर व त्याभोवती नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात तेलाचे दिवे लावतो. तसेच पूजेमध्ये समई, निरांजन, पणती, दिवे अशा नानाविध दिव्यांच्या प्रकारांचा समावेश असतो. आकर्षक रोषणाईसाठी लामणदिवा, दीपमाळा असे दिव्यांचे अनेक प्रकार पूजेमध्ये अंतर्भूत केले जातात. पण, या दिव्यांसोबत दिवाळीआधीच एक असा उपाय करायचा आहे; जो दिवाळीत तुमच्या मोठ्या फायद्याचा ठरेल. पणत्यांच्या एका जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दिवाळीआधी पणतीचा हा व्हिडीओ पाहिला, तर दिवाळीत तुम्हाला याचा मोठा फायदा होईल.
पण तुम्ही कधी टॉयलेटमध्ये पणती लावून पाहिली आहे का? टॉयलेटमध्ये पणती लावण्याचा मोठा फायदा आहे. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. टॉयलेटमध्ये पणती लावल्याने मोठ्या त्रासातून सुटका होईल. एकदा याचा परिणाम तुम्ही पाहाल तर हा उपाय नेहमी कराल. दिवाळी म्हणून तुम्ही नवीन पणत्या घेतल्या असतील. गेल्या वर्षीच्या दिवाळीतील वापरलेल्या जुन्या पणत्या आता तुमच्याकडे पडलेल्या असतील. त्या फेकून देण्याचा विचार असेल किंवा त्याचं काय करायचं असा प्रश्न असेल तर तुम्ही त्या पणत्या टॉयलेटमध्ये वापरू शकता. आता टॉयलेटमध्ये पणती लावण्याचा काय फायदा आहे, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. चला तर मग हा व्हिडीओ पाहुयात.
घरात साफसफाई काढली कि गृहिणींच्या नाकी नऊ येतात, छोट्या मोठ्या जागेवरची साफसफाई होऊन जाते पण घरात काही अश्या ठिकाणी साफसफाई कारण म्हणजे मुश्किल होऊन बसतं, जस कि बाथरूम . बाथरूम हा घरातील सगळ्यात अस्वच्छ भाग असतो. साफ सफाईकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर अस्वच्छ होते. आरोग्याच्या दृष्टीने टॉयलेट-बाथरुम स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे. छोट्या छोट्या वस्तू कधी कधी खूप मोठ्या कामाच्या असतात. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हिडीओत तुम्ही पाहाल तर गृहिणीने आधी एका भांड्यात कपड्यांची पावडर घेतली. त्यात खायचा सोडा टाकला आणि त्यात अर्धा लिंबू पिळला. त्यानंतर तिनं ते मिश्रण हातांनीच नीट मिक्स करून घेतलं. त्यानंतर एक पणती घेतली आणि या पणतीत हे मिश्रण दाबून दाबून भरलं. पणती पूर्णपणे एका प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळली. या पिशवीला एक दोरा बांधला. त्यानंतर पणतीच्या वर प्लॅस्टिकला छिद्रं पाडली.आता याचं करायचं काय तर ही पणती तुम्हाला तुमच्या टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये लावून ठेवायची आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही फ्लश कराल तेव्हा पणतीच्या प्लॅस्टिकवर असेलल्या छिद्रातील मिश्रण पाण्यात जाईल आणि त्या पाण्यानं तुमचं टॉयलेट स्वच्छ होईल. म्हणजे हा तुमचा घरगुती टॉयलेट क्लिनर तयार झाला. त्यामुळे बाजारातील टॉयलेट क्लिनरवर पैसे वाया घालवण्याची गरज नाही. शिवाय पुन्हा पुन्हा टॉयलेट स्वच्छ करण्याच्या त्रासातूनही सुटका होईल.
पाहा व्हिडीओ
Avika Rawat Foods यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.