Happy Diwali SMS for Friends & Family : देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साह, जल्लोष आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. प्रकाशाचा हा सण केवळ दिव्यांची आरास, फराळ आणि आनंदापुरता मर्यादित नसून, तो कृतज्ञतेचा आणि शुभारंभाचा दिवस आहे. दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि एकोप्याचा सण. या काळात प्रत्येक घरातून फराळाचा सुगंध दरवळतो, आकाशकंदील, तोरणं आणि दिव्यांची आरास सगळीकडे झळकते. या काळात कुटुंब, नातं आणि प्रेम यांचं बंधन अधिक दृढ होतं. वसुबारस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या प्रत्येक दिवसाला वेगळी परंपरा आणि भावनिक अर्थ असतो. दिवाळीतील पाच दिवसांच्या या उत्सवात लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक देवी लक्ष्मीची आराधना करून सुख, समृद्धी आणि वैभवाची प्रार्थना करतात. या दिवासाला खास करण्यासाठी तुम्हाला आपल्या प्रियजनांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर या शुभेच्छा संदेशाचा उपयोग होईल, पाहा खास शुभेच्छा संदेश…
लक्ष्मीपूजनाची तारीख आणि शुभ मुहूर्त २०२५
पंचांगानुसार, यंदा आश्विन अमावास्या म्हणजेच २१ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार) रोजी लक्ष्मीपूजन रोजी साजरा केला जाणार आहे. अमावास्या तिथी २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३:४४ वाजता सुरू होऊन, २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५:५४ वाजता संपेल. उदय तिथीनुसार लक्ष्मीपूजन २१ ऑक्टोबर २०२५ च्या संध्याकाळी केले जाणार आहे.
लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त:
संध्याकाळी ६:१० ते रात्री ८:४० या वेळेत पूजा करण्याचा सर्वात शुभ काळ आहे.
लक्ष्मीपूजनाचे महत्त्व
पुराणकथांनुसार, या दिवशी भगवान विष्णूंनी बळीराजावर विजय मिळवून देवी लक्ष्मीला मुक्त केले. त्यानंतर या दिवसापासून लक्ष्मीपूजनाची परंपरा सुरू झाली. व्यापारी वर्गासाठी हा दिवस विशेष मानला जातो कारण या दिवशी नव्या खात्यांची सुरुवात केली जाते आणि धनाची देवता कुबेराचे पूजन करून समृद्ध वर्षाची प्रार्थना केली जाते.
लक्ष्मीपूजनाच्या खास शुभेच्छा
धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
गोडधोड फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सहपरिवारास सोनेरी शुभेच्छा!
शुभ दिवाळी!

लक्ष्मीचा सहवास नित्य असू दे,
चांगल्या मार्गाने समृद्धी मिळू दे,
लक्ष्मीपूजनाचे सौख्य नेहमी लाभू दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळीत दारी दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घरात सुख-समृद्धी नांदू दे.
सर्वांची सारी स्वप्नं साकार व्हावीत,
ही दिवाळी आपल्यासाठी सुवर्ण ठरावी.
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

घरात लक्ष्मीचा वास
अंगणी दिव्यांची आरास
वाढवी मनाचा उल्हास
दिवाळी सण आहे खास
शुभ दीपावली

लक्ष्मी आली सोनपावलांनी,
उधळण झाली सौख्याची,
धन-धान्यांच्या राशी भरल्या,
घरी नांदू दे सुख-समृद्धी!

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या सोनेरी पावलांनी
तुमच्या घरी सुख-समृद्धी येऊ दे
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीत खाऊया खूप साऱ्या मिठाया,
फराळासाठी मित्रांना बोलवूया,
शेजाऱ्यांच्या दरवाजांवरही लावूया पणत्या,
प्रियजनांना आनंदाने मिठी मारू या,
लक्ष्मीची आरती करू या,
सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
लक्ष्मीच्या सोनपावलांनी आपल्या घरात सुख-समृद्धी आणि आनंद येवो.
अंधकार दूर करून सर्वांचे आयुष्य आपल्या तेजाने उजळून टाकणाऱ्या दीपोत्सवाच्या लक्ष लक्ष आरोग्यदायी शुभेच्छा!
दिवाळीच्या खास शुभेच्छा
गोवर्धन पूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंद, उत्साह अन् हर्ष उल्हासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला,
दिवाळीच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!!!

फराळाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
एकच मागणे दिवाळी सणाला
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

चंद्राचा कंदील घरावरी
चांदण्यांचे तोरण दारावरी…
क्षितिजाचे रंग रांगोळीवरी
दिवाळीचे स्वागत घरोघरी..!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभ दीपावली…

सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली
तिखट-गोड फराळाची मेजवानी सजली
आनंदाची उधळण करीत आली दिवाळी
दिवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा!
घेऊनी सोनेरी प्रकाश दिव्यांचा,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!
जुने सारे विसरून जावे
सुख-दु:ख वाटून घ्यावे
पर्यावरणाशी एकरूप व्हावे
सुख-समृद्धीचे बीज पेरावे
अवतरला उत्सव प्रकाशाचा
तेजस्वी सण आला दिवाळीचा
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!
मराठमोळी संस्कृती आपली,
मराठमोळी माती आपली,
मराठमोळा आपला बाणा,
मराठमोळा उत्सव आपला
अशीच चिरंतन राहो आपली ही प्रेमाची नाती,
शुभ दीपावली…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही दिशा
घेऊनी येवो नवी उमेद, नवी आशा
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांची पुष्पे घेऊनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेऊनी, दीपावली ही आली..
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!
आपल्या जीवनातल्या अंधाराचा नाश होवो,
कर्माची वात, भक्तीचं तेल
आत्म जाणिवेची ज्योत लावून
आपल्या ज्ञानाचा प्रकाश सदैव तेवत राहो…
हीच ईश्वरचरणी सदिच्छा!!!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
बालपणाच्या गोड आठवणींनी भरलेला उत्सव,
फटाक्यांनी भरलेले आकाश
मिठायांनी भरलेले तोंड,
दिव्यांनी भरलेले घर,
आणि हृदयात आनंद…
दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा…!!!
आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
फटाके, कंदील अन्
पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही
लज्जत न्यारी…
नव्या नवलाईची दिवाळी येता,
आनंदली दुनिया सारी…!
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ,
गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी,
हीच देवाचरणी प्रार्थना,
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
दिवाळीची शान तेव्हाच आहे
जेव्हा गरिबांची मुलंही लावतील फुलबाज्या,
त्यांच्याकडेही असेल मिठाई,
जोपर्यंत दूर होणार नाही हा भेदभाव
तोपर्यंत कशी होईल दिवाळीची खरी रोषणाई…
सर्वांना करून आनंदी
मगच साजरी करा दिवाळी.
दीपावलीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा
जीवनाचे रूप आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी खरोखरच अलौकिक असून,ती तुमच्यासाठी सुख, समाधान आणि वैभवाच्या दीपमाळांनी जीवन लखलखीत करणारी असावी… दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
दीपावलीच्या आजपासून ते भाऊबीजेपर्यंतच्या साजऱ्या होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!. हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो याच मनोकामना…! दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
लोकसत्ता डॉट कॉमकडून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा!