Diwali skincare Haldi-Adrak Water For Diwali Skin Glow: दिवाळीचा काळ म्हणजे आनंद, नवे कपडे, मिठाई, भेटीगाठी आणि फटाके. अर्थातच स्वतःकडे लक्ष देण्याची उत्तम संधी. दिवाळी जवळ येताच लोक त्यांच्या त्वचेची चमक वाढविण्यासाठी पार्लरमध्ये जाऊ लागतात. पण, अनेकदा या उत्साहात आपण आपल्या त्वचेची काळजी घ्यायला विसरतो. रात्री उशिरापर्यंत जागरण, सतत मेकअप करणे, सणाच्या तयारीत वाढलेला ताणतणाव, फराळ बनवताना तेलाने चेहरा काळवंडतो, तर फटाक्याच्या धुराने चेहऱ्यावर संसर्गाची बाधा होते. या सगळ्यामुळे चेहऱ्यावर थकवा आणि निस्तेजपणा दिसू लागतो. पण, तुम्हाला माहीत आहे का की, आता तुम्ही पार्लरमध्ये न जाताही तुमची त्वचा चमकदार करू शकता? जर तुम्हाला या दिवाळीत चेहऱ्यावर चंद्रासारखी नैसर्गिक चमक हवी असेल, तर फक्त हे पाणी सकाळी प्या.

हळदी-आल्याचे पाणी कसे मदत करते?

हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, जे त्याच्या दाहकविरोधी, अँटिऑक्सिडंट व अँटीमायक्रोबियल गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे संयुग आहे. आले रक्ताभिसरण वाढवते, पचनास मदत करते आणि त्वचेच्या संसर्गाशी लढण्यास मदत करते. एकत्रितपणे ते एक शक्तिशाली डिटॉक्स तयार करते, जे आतून शुद्ध करते, स्वच्छ व उजळ त्वचेला आधार देते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलिक्युलर सायन्सेसमधील २०२४ च्या पुनरावलोकनात त्वचेची जळजळ, मुरमे आणि अकाली वृद्धत्वावर उपचार करण्यात त्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

हार्वर्ड हेल्थ त्वचेच्या आजारांवर उपचार करण्यासाठी हळदीचा दीर्घकालीन वापर आणि मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करणारे त्याचे अँटीऑक्सिडंट प्रोफाइल यावर प्रकाश टाकते. पोषणतज्ज्ञ अंजली मुखर्जी पुढे म्हणतात, “हळदीतील कर्क्यूमिन आणि आल्यातील जिंजरॉलसारख्या जैविक घटकांमध्ये शक्तिशाली उपचारात्मक गुणधर्म असतात. योग्य प्रमाणामध्ये वापरल्यास ते आरोग्य आणि त्वचेला चांगला फायदा देते.

त्वचेसाठी आणि शरीरासाठी हळदी-आल्याच्या पाण्याचे फायदे :

१. रंग उजळवते: हळदीतील कर्क्यूमिन मेलेनिनचे उत्पादन कमी करण्यास मदत करते म्हणजेच काळे डाग कमी होतात आणि त्वचेचा रंग अधिक एकसारखा होतो. नियमित सेवनाने तुमची नैसर्गिक चमक हळूहळू वाढू शकते आणि छान चेहरा मिळू शकतो. त्याची सौम्य एक्सफोलिएटिंग क्रियादेखील कंटाळवाणा, थकलेल्या त्वचेला पुनरुज्जीवित करण्यास मदत करतो.

२. मुरमे आणि डागांशी लढते : हळद आणि आले या दोन्हींमध्ये शक्तिशाली अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे मुरमे निर्माण करणाऱ्या जीवाणूंशी लढतात. आल्याचे जिंजरॉल आणि हळदीचे कर्क्यूमिन हे दोन्ही घटक लालसरपणा कमी करण्यासाठी, मुरमे जलद गतीने कमी करण्यासाठी आणि मुरमांनंतरच्या खुणा रोखण्यासाठी मदत करतात.

३. आतून हायड्रेट करते: डिहायड्रेशन हा तुमचा चमक कमी करण्याचा सर्वांत जलद मार्गांपैकी एक आहे. आल्यामधील नैसर्गिक तेले आणि हळदीचे डिटॉक्सिफायिंग स्वरूप तुमच्या शरीरात ओलावा चांगल्या प्रकारे टिकवून ठेवण्यास मदत करते. याचा अर्थ मऊ, अधिक लवचिक त्वचा जी फिकट किंवा थकलेली दिसत नाही.

४. सूज आणि जळजळ कमी करते : नियमित सेवनाने डोळ्यांखालील सूज आणि चेहऱ्यावरील सूज कमी होऊ शकते, ज्यामुळे तुमचा चेहरा एकदम सुंदर, ताजातवाना दिसतो.

५. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: तुमची त्वचा तुमच्या अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंबित करते. हळद आणि आले या दोन् वस्तूही पांढऱ्या रक्तपेशींच्या क्रियाकलापांना चालना देतात आणि शरीराच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला समर्थन देतात. जेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते, तेव्हा तुमची त्वचा फुटण्याची, पुरळ येण्याची किंवा थकल्यासारखे दिसण्याची शक्यता कमी असते.

६. पचन आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते: आयुर्वेद अनेकदा आतड्यांचे आरोग्य थेट त्वचेच्या आरोग्याशी जोडतो. आले पाचक एंझाइम्सना उत्तेजित करते, तर हळद पित्त प्रवाह आणि यकृताच्या विषारी पदार्थांचे निर्मूलन करण्यास मदत करते. एकत्रितपणे ते पचनास मदत करतात, सूज कमी करतात, ज्यामुळे मुरमे आणि निस्तेजपणासारख्या जळजळ-प्रेरित समस्या कमी होतात.

हळदी-अद्रक पाणी कसे बनवायचे?

साहित्य:

१/२ टीस्पून सेंद्रिय हळद पावडर (किंवा किसलेली ताजी हळद), १/२ इंच ताजे आले (किसलेले), १ ग्लास (२५० मिली) कोमट पाणी, चिमूटभर काळी मिरी, १/२ टीस्पून लिंबाचा रस + १ टीस्पून मध.

कृती :

  • पाणी कोमट होईपर्यंत गरम करा.
  • त्यात हळद व आले घाला आणि ते द्रावण चांगले ढवळा.
  • आता त्यात काळी मिरी, लिंबाचा रस व मध मिसळा.
  • तयार झालेले पेय २-३ मिनिटे तसेच राहू द्या. मग ते कोमट असतानाच शक्यतो रिकाम्या पोटी प्या.