लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराच्या आजारांचा धोका खराब दिनचर्या, चुकीचा आहार आणि तणावामुळे वाढतो. या आजारांपासून बचाव करण्यासाठी आपल्या दिनचर्येत बदल करणे, योग्य आहार घेणे आणि दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. तसंच जर तुम्ही औषधं घेत असाल, तर ती घेताना काही नियमांचे पालन करणे देखील गरजेचं आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार खाण्यापिण्याच्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचे सेवन औषध घेतल्यानंतर अजिबात करू नये. त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तर जाणून घेऊया अशा पदार्थांबद्दल ज्यांचे सेवन औषध- गोळ्या केल्यानंतर करता नये.

पालेभाज्या

तज्ञांच्या मते, हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यानंतर किंवा खाताना औषध घेऊ नये. विशेषतः, व्हिटॅमिन-के असलेल्या गोष्टींचे सेवन केल्यानंतर वॉरफेरिन घेणे हानिकारक आहे. रक्त प्रवाह, रक्ताच्या गुठळ्या आणि रक्ताशी संबंधित रोगांचे परिणाम कमी करण्यासाठी वॉरफेरिनचा वापर केला जातो. यासाठी ब्रोकोली आणि हिरव्या पालेभाज्या खाल्ल्यानंतर लगेच औषध घेऊ नका.

( हे ही वाचा: आंघोळीनंतरही शरीराचे ‘हे’ पाच भाग राहतात अस्वच्छ; दुर्लक्ष केल्यास होईल मोठा अपाय)

ग्रीन टी

तुम्ही जर ग्रीन टी चे चाहते असाल, तर ग्रीन टी पिताना किंवा पिल्यानंतर औषध चुकूनही घेऊ नका. औषधामध्ये असलेले रासायनिक घटक आम्लता वाढवण्यासाठी ग्रीन टीवर प्रतिक्रिया देऊ शकतात. यासाठी ग्रीन टी पिताना औषध अजिबात घेऊ नये. ग्रीन टीसोबत औषध घेतल्याने तुमचे नुकसान होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अल्कोहोल

अल्कोहोलसह औषध अजिबात घेऊ नका. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोलचे सेवन केल्याने यकृतावर वाईट परिणाम होतो. यकृताचे नुकसान देखील होऊ शकते. त्याच वेळी, औषधाचा दीर्घकाळ वापर केल्याने यकृतावर विपरित परिणाम होतो. यासाठी अल्कोहोलसोबत किंवा त्यानंतरही औषध अजिबात घेऊ नका. यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होतात.