कॉफी पिताना ‘या’ ३ चुका करू नका, उद्भवू शकतात अनेक समस्या

एका व्यक्तीने एका दिवसात २ कपपेक्षा जास्त कॉफी पिऊ नये.

lifestyle
संध्याकाळी कॉफी पिणे टाळा. (photo: pixabay/ jansatta)

भारतात असे बरेच लोकं आहेत जे आपल्या दिवसाची सुरुवात एक कप गरम कॉफीने करतात. काही लोकं सकाळी उठल्याबरोबर चहा आणि कॉफीला प्राधान्य देतात, तर काही लोकांना दिवसातून किमान ४ ते ५ वेळा कॉफी पिण्याची सवय असते. कॉफीचेही फायदे आहेत, पण ती पिण्यासाठी योग्य वेळ असणे गरजेचे आहे. प्रत्येकाला माहित आहे की कॉफीमध्ये कॅफिन असते आणि जास्त कॉफी पिणे तुमच्यासाठी खूप धोकादायक आहे. काही लोकांना कॉफी प्यायल्याने ताजेतवाने आणि ऊर्जा मिळते. तर दुसरीकडे काही लोकांना त्याची चव आवडते.

हे अँटिऑक्सिडंट्सचे एक उत्तम स्त्रोत देखील आहे जे तुम्हाला अनेक आरोग्य फायदे देऊ शकतात. पण तुम्हाला कॉफीचे व्यसन आहे का? अनेकदा लोकं ऑफिसमध्ये काम करताना किंवा सतत अभ्यास करताना लक्षणीय प्रमाणात कॉफी पितात. तुम्ही जर कॉफी प्यायला असाल तर तुम्हाला माहित असले पाहिजे की एका दिवसात किती कप कॉफी सुरक्षित आहे, म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक उपाय घेऊन आलो आहोत जो कॉफी पिण्यापूर्वी अवलंबू शकता.

जास्त सेवन

एका व्यक्तीने एका दिवसात २ कपपेक्षा जास्त कॉफी पिऊ नये. यापेक्षा जास्त कॉफीच्या सेवनाने तुम्हाला चक्कर येणे, रक्तातील ऍसिडचे प्रमाण वाढणे, पोटदुखी, अनियमित किंवा जलद हृदयाचे ठोके आणि हृदयाला रक्तपुरवठा कमी होणे असे त्रास होऊ शकतात. याशिवाय, ते तुमची चिंता, निद्रानाशाची पातळी देखील वाढवू शकते आणि तुम्हाला नेहमी थकल्यासारखे वाटू शकते.

संध्याकाळच्या वेळेस कॉफी पिऊ नका

संध्याकाळी कॉफी पिणे टाळा. मात्र, संध्याकाळी कॉफीसोबत स्नॅक्स घेण्याची मजा काही औरच असते. पण, संध्याकाळी उशिरा कॉफी प्यायल्याने तुम्हाला भूक लागू शकत नाही. अशा स्थितीत अनेकवेळा जेवायची इच्छा होत नाही. याशिवाय संध्याकाळी उशिरा कॉफी प्यायल्याने रात्री झोपताना त्रास होऊ शकतो.

कॉफीत खूप साखर वापरू नका

रिफाइंड साखरेमध्ये शून्य पोषक आणि फक्त कॅलरी असतात. तुम्ही रिफाइंड साखरेचे सेवन केल्यास किंवा जास्त साखरेचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जा कमी होऊ शकते. त्याचबरोबर लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो. शक्य असल्यास, गूळ सारख्या आरोग्यदायी पदार्थांचा वापर करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Do not make these 3 mistakes while drinking coffee you may have many problems scsm

ताज्या बातम्या