तुम्हाला आय लायनर लावताना काही अडचण येतेय? तर ‘या’ टिप्स फॉलो करा!

तुम्ही पेन्सिल लाइनर वापरा. लिक्विड लाइनरच्या तुलनेत हे लागू करणे खूप सोपे आहे आणि ते पसरण्याची भीती नाही.

lifestyle
आय लायनर चांगले लावण्यासाठी तुम्ही सेलो टेपची मदत घेऊ शकता. (photo: freepik)

डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक मुली आणि महिलांना आय लायनर लावण्याची आवड असते. पण काही महिलांना व मुलींना इच्छा असूनही आय लायनर लावत नाहीत. कारण अनेक वेळा लायनर लावताना हात थरथरू लागतात किंवा डोळ्याचा कोपरा व्यवस्थित लागला जात नाही. अनेकवेळा प्रयत्न करूनही ते योग्य वाटत नाही. त्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्या ऐवजी कमी होत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्याने तुम्ही आयलायनर योग्य प्रकारे लावू शकाल. इतकंच नाही तर या टिप्सच्या मदतीने ज्या मुली पहिल्यांदा आय लाइनर लावत असतील त्या देखीलसुंदरपणे लावू शकतील.

हातांना आधार द्या

आय लायनर लावताना हात थरथरत असल्यास तुमच्या कोपराला आधार देण्यासाठी तुम्ही कशाची तरी मदत घेऊ शकता. जेव्हा तुमच्या हाताचा कोपर आरामशीर असेल, तेव्हा लाइनर लावण्यास कोणतीही अडचण येणार नाही आणि ते योग्य प्रकारे सहजतेने तुमच्या डोळ्यांना लागू होईल.

डोळ्यांच्या छोट्या छोट्या पार्टमध्ये आय लायनर लागू करा

खूप प्रयत्न करूनही अनेक महिलांना एकाच वेळी लायनर लावता येत नाही. अशा स्थितीत लहान भागांमध्ये आय लायनर लावा. नंतर, या सर्व ओळी एकत्र जोडा. याने आय लायनर व्यवस्थित लावले जाईल आणि लूकही सुंदर दिसेल.

पेन्सिल आय लाइनर वापरा

जर लाइनर लावताना तुमचे हात थरथर कापत असतील किंवा इतर काही कारणाने लाइनर नीट लावला जात नसेल. त्यावेळी तुम्ही पेन्सिल लाइनर वापरा. लिक्विड लाइनरच्या तुलनेत हे लागू करणे खूप सोपे आहे आणि ते पसरण्याची भीती नाही.

टेपचा वापर करा

अनेक वेळा मुली आय लायनर लावतात पण त्यातून आय कॉर्नर नीट तयार होत नाही. तर आय लायनर चांगले लावण्यासाठी तुम्ही सेलो टेपची मदत घेऊ शकता. यासाठी टेपचा एक छोटासा भाग कापून डोळ्यांखाली किंचित तिरपे लावा. मग आय लायनर लावा, मग ते डोळ्यांचे कोपरे चांगल्या प्रकारे बनवण्यास सक्षम होईल आणि डोळे सुंदर दिसण्यास मदत होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Do you have any problems applying eye liner so follow these tips scsm

ताज्या बातम्या