दह्याच्या सेवनासंबंधी आपण अनेक गोष्टी ऐकत असतो. दही खाणे चांगले की वाईट हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. परंतु दही हा पदार्थ प्रोटीनचा म्हणजेच प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. बहुतांश लोक उन्हाळ्यात दह्याचे सेवन करतात. परंतु युरिक अ‍ॅसिडची समस्या असलेल्या लोकांमध्ये असा गैरसमज आहे की दह्यातील प्रोटीनची मात्रा युरिक अ‍ॅसिड वाढवण्याला कारणीभूत ठरू शकते. खरंतर, शरीरातील प्रोटीनची मात्रा अधिक झाल्यास युरिक अ‍ॅसिड वाढण्याची शक्यता असते. परंतु दह्याच्या सेवनामुळे या रुग्णांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे की दही खाल्ल्यामुळे युरिक अ‍ॅसिड वाढत नाही. याउलट जर तुम्ही उन्हाळ्यात दह्याचे सेवन केल्यास तुमची पचनशक्ती मजबूत होते. तसेच, दही तुम्हाला ताजेतवाने करण्यास मदत करते.

दातांच्या पिवळेपणामुळे हैराण आहात? ‘या’ ५ घरगुती उपायांनी मिळेल सुटका

युरिक अ‍ॅसिडची समस्या असणाऱ्या रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागतो. अशावेळी या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी दह्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. म्हणजेच, तुम्ही प्रथिनांनी भरलेले सर्व प्रकारचे पदार्थ खाऊ शकता. यामुळे तुमचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही.

युरिक अ‍ॅसिडची लक्षणे :

  • जर तुम्हाला सांधेदुखी असेल आणि तुम्हाला उठताना आणि बसण्यात अडचण येत असेल, तर ते युरिक अ‍ॅसिडचे मुख्य लक्षण आहे.
  • याशिवाय बोटांना सूज येणे हे देखील युरिक अ‍ॅसिड वाढण्याचे लक्षण आहे.
  • तसेच, जर तुमच्या सांध्यांमध्ये गाठी तयार होत असतील असेल तर तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे.

Photos : केळींबदद्ल ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? जाणून घेऊया

दही खाण्याचे फायदे

  • दह्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.
  • यासोबतच रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
  • दात आणि हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही दह्याचे सेवन करू शकता.
  • याशिवाय हृदय सुरक्षित ठेवण्यासाठीही दही फायदेशीर आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you have uric acid problems then know these things before eating yogurt pvp
First published on: 21-04-2022 at 10:30 IST