Haldi Water Benefits : हळद हा अतिशय गुणकारी पदार्थ आहे. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा महत्वाचा घटक आहे ज्यामुळे हळद आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. हळदीचा वापर अनेक पदार्थ तयार करताना मसाल्यांचा स्वरुपात केला जातो. याशिवाय हळदी दूध पिण्याचा सुद्धा सल्ला दिला जातो. एखादी जखम झाल्यास रक्तस्त्राव थांबवण्यासाठी सुद्धा हळद फायदेशीर ठरते. लहानपणापासून असे अनेक हळदीचे फायदे आपण वाचलेले आहेत आणि ऐकलेले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हळदीचे पाणी पिण्याचे फायदे सांगितले आहेत.

होमिओपॅथिक डॉक्टर व न्युट्रिशनिस्ट डॉ. स्मिता भोइर पाटील यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये त्या हळदीचे पाणी पिण्याचे फायदे सांगताना दिसत आहे.

त्या सांगतात, “हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा घटक असतो आणि ते अँटीइन्फ्लेमेटरी आणि आणि अँटिऑक्सिडंट्स आहेत. म्हणजे शरीरातील सूज कमी करण्यासाठी, शरीराचे दुखणे कमी करण्यासाठी हे खूप उपयोगी आहे. जर तुम्हाला स्नायूमध्ये त्रास होत असेल, गुडघ्यामध्ये दुखणे असेल किंवा शरीरामध्ये कुठेही दुखत असेल. तर तुम्ही नियमित हळदीचे सेवन करायला पाहिजे. कारण यामुळे सूज कमी होते आणि दुखणे कमी होण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असते. जर तुम्हाला अॅलर्जीचा त्रास असेल. स्किनची अॅलर्जी असेल, शिंका येणे, खोकला येणे, असे जर त्रास होत असतील तर ते कमी करण्यासाठी हळद उपयोगी ठरते. जेव्हा पण शरीरामध्ये अॅलर्जी होते तेव्हा हिस्टॅमिन लेव्हल वाढते. ही लेव्हल नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी हळद फायदेशीर असते. हळद आपण नियमित जेवणामध्ये टाकतो पण त्याचा तितका फायदा होत नाही. कारण हळद आपल्या शरीरामध्ये सोप्या पद्धतीने शोषून घेतली जात नाही. त्यामुळे हळदीचे योग्य पद्धतीने सेवन करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद, एक चमचा तुप, चिमुटभर काळे मिरे टाका. हळदीमधील कर्क्युमिन नावाचा घटक शरीरात शोषून घेण्यासाठी काळे मिरेचे सेवन गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकारे हळदीचे सेवन केले तरच तुम्हाला फायदा होईल.”

पाहा व्हायरल व्हिडीओ

dr.smita_peachtreeclinic या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जास्तीत जास्त फायद्यासाठीहळदीचे पाणी कसे प्यावे ?

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात १/२ चमचा सेंद्रिय हळद मिसळा.
त्यात चिमूटभर काळी मिरी टाका – त्यामुळे हळदीतील कुरकुमिनचं शोषण चांगलं होतं.
अधिक फायदे मिळवण्यासाठी लिंबाचा रस किंवा चमचाभर आवळा रस घालू शकता.
हे मिश्रण हळूहळू प्यावे, जेणेकरून शरीराला व्यवस्थित शोषण करता येईल.
नियमित सेवन केल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, जळजळ कमी होते आणि त्वचा चमकदार होते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी माहिती शेअर केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.