आपल्या प्रिय व्यक्तीला मिठी मारणे हे कोणत्याही नात्यात प्रेम व्यक्त करण्याची अतिशय साधी परंतु परिणामकारक पद्धत आहे. आलिंगनाला खूप महत्त्व असते. कोणी तरी आपल्याला मिठी मारते किंवा आपण एखाद्याला मिठी मारतो हा एक सुखद अनुभव असतो. कोणीही कितीही त्रासलेला का असेना, जवळच्या व्यक्तीला मिठी मारल्याने त्याला बरे वाटते. कारण मिठी मारल्याने एका व्यक्तीची आत्मिक ऊर्जा दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहोचते. परंतु मिठीचेही अनेक प्रकार आणि अर्थ असतात. आपण एखाद्याला कशी मिठी मारतो यावरून या मिठीचा अर्थ जाणून घेता येतो. म्हणजेच आपल्या नात्याचा अर्थ कळतो. वेगवेगळ्या प्रकारची मिठी सांगते की तुम्ही तुमच्या नात्याच्या कोणत्या स्तरावर आहात.
एका बाजूने मारलेली मिठी (Side hug)
जेव्हा दोन व्यक्ती एका बाजूनेच एकमेकांना मिठी मारतात तेव्हा ती मैत्रीच्या भावनेतून मारलेली मिठी असते. जेव्हा एखादी व्यक्ती अशाप्रकारची मिठी मारते तेव्हा ती आपल्या जोडीदाराकडे पूर्णपणे झुकलेली नसते. एखाद्याला प्रोत्साहन देण्यासाठी मारलेली ही मिठी असते.
यंदाचा व्हॅलेंटाइन वीक ‘या’ राशीच्या व्यक्तींसाठी ठरणार खास; मनातील इच्छा होणार पूर्ण
मागून मिठी मारणे (Hugging from behind)
यामध्ये, एकजण दुसऱ्या व्यक्तीच्या मागे उभा राहतो आणि त्यांच्या जोडीदाराच्या छातीभोवती हात गुंडाळून त्यांना मिठी मारतो. ही पोज अतिशय रोमँटिक असून बहुतांश जोडपी अशी मिठी मारताना दिसतात. पालक-मुलांच्या नात्यातही ही मिठी दिसून येते. पालक त्यांच्या मुलाच्या उंचीपर्यंत खाली बसू शकतात आणि एक गोंडस चित्र क्लिक करू शकतात. तर, आपल्या जोडीदारासोबत शारीरिकदृष्ट्या जवळीक साधण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित वाटण्यासाठी ही मिठी मारली जाते.
मैत्रीपूर्ण मिठी (Friendly hug)
ही एक अतिशय मैत्रीपूर्ण पोझ आहे जिथे दोन लोक एकमेकांना हाताने मिठी मारतात. दोघांच्या कंबरेमध्ये योग्य अंतर असते जेणेकरून त्याचा लैंगिक किंवा रोमँटिक असा वेगळे अर्थ लावला जाऊ नये. ही मिठी सोपी आणि जलद असते. तसेच, बऱ्याच काळापासून न पाहिलेल्या व्यक्तीला अभिवादन करण्यासाठी ही मिठी मारली जाते.
कमरेभोवती मिठी मारणे (Hugging around the waist)
अशाप्रकारच्या मिठीमध्ये जोडीदार एकमेकांना अगदी जवळून मिठी मारतात. ही एक अतिशय रोमँटिक पोझ आहे जी जोडप्यांना पुढील जवळीक साधण्यास परवानगी देते.
बेअर मिठी (Bear hug)
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या छातीवर डोकं ठेवून झोपते आणि हात छातीवर ठेवून त्यांना खूप जवळून मिठी मारते तेव्हा ही मिठी बेअर मिठी म्हणून ओळखली जाऊ शकते. ही मिठी आपल्याला आपल्या जोडीदाराच्या कुशीत उबदार आणि सुरक्षित वाटण्यास मदत करते. या प्रकारची मिठी आपल्याला दिवसभराच्या थकव्यानंतर आराम करण्यास मदत करते.
एकतर्फी मिठी (One-sided hug)
या प्रकारच्या मिठीत, दोन व्यक्ती एकमेकांच्या समोरासमोर असतात परंतु फक्त एकच व्यक्ती दुसर्याला मिठी मारण्यास उत्सुक असते आणि म्हणून ते आपले हात समोरच्या व्यक्तीभोवती गुंडाळतात. मुख्यतः कठीण काळात, आधार मिळवण्यासाठी एका व्यक्तीकडून करण्यात आलेले हे भावनिक आलिंगन असते.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)