Bad Food Combinations: लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच दुधाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे, कारण दुधाला संपूर्ण आहार मानले जाते, यात कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते; इतकेच नाही तर दुधात फायबर, लोह, सोडियमसह अनेक पोषक घटकदेखील आढळतात, याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. तसेच शरीराला ताकद मिळते. पण, तुम्हाला माहिती आहे का की इतके पौष्टिक असूनही, दूध तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण आयुर्वेदात दुधाबरोबर काही पदार्थांचे सेवन वर्ज्य मानले जाते.
दुधाबरोबर कधीही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन
दूध आणि कांदा
कांदा आणि दूध तुम्ही एकत्र खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. यामुळे त्वचेच्या समस्या, खाज अशा अनेक समस्या उद्भवतात.
दूध आणि फणस
दूध आणि फणस कधीही एकत्र खाऊ नये. फणस खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नये, कारण ते एकमेकांवर प्रतिकूल प्रतिक्रिया देत नाहीत. यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. इतकेच नाही तर त्यांना एकत्र खाल्ल्याने खाज सुटण्याची समस्यादेखील होऊ शकते.
दूध आणि लिंबूवर्गीय फळे
कधीही दूध आणि आंबट फळे एकत्र खाऊ नका. दुधाबरोबर संत्री, मोसंबी, लिंबूदेखील खाऊ नका. आंबट फळे आणि दूध एकत्र खाल्ल्याने गॅस, अपचन, बद्धकोष्ठता होऊ शकते.