scorecardresearch

Premium

Relationship Tips : जोडीदाराबरोबर तुमचे नातेसंबध चांगले नाहीत का? नाते घट्ट करण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

जोडीदाराबरोबर चांगले नाते निर्माण करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतात पण अनेकदा खूप प्रयत्न करुनही काहीही फायदा होत नाही. अशावेळी काय करावे, काही सुचत नाही. आज आपण या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

do you not have a better Relationship with Partner
जोडीदाराबरोबर तुमचे नातेसंबध चांगले नाहीत का? (Photo : Instagram)

Relationship Tips : प्रत्येकाला वाटतं की त्यांच्या जोडीदाराबरोबर त्यांचे नाते खूप चांगले, आनंदी दीर्घकाळ टिकणारे असावेत.कोणत्याही नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा असणे खूप जास्त गरजेचे आहे. जोडीदाराबरोबर चांगले नाते निर्माण करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतात पण अनेकदा खूप प्रयत्न करुनही काहीही फायदा होत नाही. अशावेळी काय करावे, काही सुचत नाही. आज आपण या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

सायकॉलॉजिस्ट डॅनिअल जी अमेन यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर या संदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहेत. ते या व्हिडीओमध्ये सांगतात, “तुम्हाला तुमच्या जोडीदाराविषयी काय आवडत नाही यापेक्षा जोडीदाराविषयी काय आवडते, यावर लक्ष केंद्रित करा.”

Stop Breaking Nails While Washing dishes Cooking With Simple Remedies Skin Expert Tells How To Make Nail Grow Faster & thick
भांडी घासली, स्वयंपाक केला तरी नखे सहज तुटणार नाहीत यासाठी डॉक्टरांनी सांगितले उपाय; या टिप्स हात करतील सुंदर
are you trying for weight loss try right way to eat food mini meals can help in portion control
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात? तज्ज्ञांनी सांगितली खाण्याची योग्य पद्धत….
Car Buying Tips
New Car Buying Guide: नवीन कार खरेदी करायचा विचार करताय? ‘या’ ७ गोष्टींविषयी जाणून घ्या, नाहीतर बसेल मोठा फटका
Why do breasts itch?
स्तनांना वारंवार खाज सुटते? काय आहे त्यामागचे कारण? जाणून घ्या कशी मिळवू शकता ‘या’ त्रासातून सुटका

आपल्याला जोडीदाराविषयी काय आवडते किंवा आपण त्यांच्या कोणत्या गोष्टींचे कौतुक करतो, हे महत्वाचे आहे पण याशिवाय आपली वागणूक आणि सवयी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात यामुळे आपले नाते अधिक सुधारतात. याविषयी जिंदाल इन्स्टिट्यूट ऑफ बिहेवियरल सान्ससेस येथील डॉक्टरल रिसर्च फेलो इरफान फयाज ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगतात, “कोणत्याही नात्यात जेव्हा जोडीदार भावनिक, शारीरिक, आणि मानसिक दृष्ट्या सहकार्य करतो आणि खुल्या विचारांनी आणि प्रामाणिकपणे संवाद साधतो, विश्वास ठेवतो, आदर करतो, एकमेकांचे कौतुक करतो, सहानुभूती व्यक्त करतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांचे महत्व समजून घेतो, तेव्हा ते नातेसंबध चांगले असते.”

हेही वाचा : कोरफडीसोबत ‘हे’ पदार्थ मिसळून बनवा घरगुती तेल, केसांची गळती कमी होऊन दाटपणा वाढेल; पाहा ही रेसिपी

चांगले नातेसंबंध टिकवण्यासाठी खालील टिप्स जाणून घ्या

  • कोणत्याही नात्यात जोडीदाराला वेळ देणे खूप जास्त गरजेचे आहे. एकमेकांसाठी वेळ काढा. एकमेकांना पुरेसा वेळ द्या. यामुळे तुम्हाला एकमेकांबरोबर संवाद साधता येईल.
  • जोडीदाराचे नेहमी कौतुक करा. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराचे कौतुक करता किंवा कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा नाते अधिक दृढ होते. यासाठी तुम्ही त्यांना धन्यवाद म्हणू शकता किंवा ‘आय लव्ह यू’म्हणत प्रेम व्यक्त करू शकता.
  • कोणत्याही नात्यात संवाद खूप गरजेचा आहे. त्यामुळे नियमित जोडीदाराबरोबर बोला आणि त्यांच्याबरोबर संवाद साधा. यामुळे एकमेकांचे विचार, भावना आणि गरजा समजून घेणे सोपी जाते.
  • नात्यात प्रत्येक गोष्टीत समतोल राखणे खूप जास्त गरजेचे आहे.जर तुमचा जोडीदार बोलत असेल तर त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
  • नात्यात प्रेम व्यक्त करणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे क्षणोक्षणी प्रेम व्यक्त करायला विसरू नका.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Do you not have a better relationship with partner things you should do to make strong bond ndj

First published on: 04-12-2023 at 11:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×