Yoga For Winters: तुम्हाला जर तुमची जीवनशैली उत्कृष्ट हवी असेल तर आपल्या आयुष्यात योगाचा समावेश करून घ्या. योगा केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी आणि चांगलं राहातं. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. यात हवामानातील बदलांसोबतच शरीरातही बदल व्हायला लागतात. अशा वेळी थोडासा जरी निष्काळजीपणा केला तर आजार होऊ शकतो. नियमित योगा केल्याने सर्दी-खोकला दूर होतो. हिवाळ्यात आजारांपासून बचाव करण्यासाठीही योगा फायदेशीर आहे. म्हणून या हिवाळ्यात खालील योगासने केल्यास तुम्ही सुदृढ आणि आजारांपासून दूर राहाल. आज आपण हिवाळ्यात कोणती योगासने करणे फायदेशीर ठरते. याविषयी जाणून घेणार आहोत.

सूर्य नमस्कार

Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

सूर्यनमस्कारांना ‘फूल बॉडी वर्कआऊट’ म्हटले जाते. यात एकूण बारा आसने आहेत. नियमित सूर्य नमस्कार केल्याने शरीरात लवचिकता येते. तसेच, शरीरात रक्त परिसंचरण आणि ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतो. हृदयरोगाचा धोका कमी होतो, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, रोगप्रतिकारक शक्ती आणि मज्जासंस्था यांचे कार्य सुरळीत होते. सूर्यनमस्कारामुळे मधुमेह, संधिवात आणि तणाव यासारख्या आजारांपासून शरीराचे संरक्षण होते.

कुंभकासन
कुंभकासनाचा नियमित सराव हाडांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. याचा नियमित सराव केल्याने तुमच्या खांद्याची हाडेही मजबूत होतात. दररोज योग्यरित्या सराव केल्याने ओटीपोटाचे आणि नितंबाचे स्नायू तसेच पाठीचा कणा मजबूत होतो. कुंभकासनाचा सराव केल्यास हिवाळ्यात शरीराचे तापमान वाढते.

आणखी वाचा : Weight loss Diet: वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ; रक्तातील साखरही नियंत्रणात येण्यास होईल मदत

त्रिकोणासन
दोन्ही पायांमध्ये दोन फूट अंतर ठेवून सरळ उभे राहा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत वर करुन घ्या. आता डाव्या बाजूने वाकत डाव्या हाताने डाव्याचा पायाचा अंगठा पकडा. उजवा हात वर सरळ रेषेथ ठेवा. थोडा वेळ याच पोजिशनमध्ये राहा.

वशिष्ठासन
योगा मॅटवर सरळ झोपा. यानंतर एका अंगावर सरळ झोपा. यानंतर शरीराचा संपूर्ण जोर एका हातावर येऊ द्या. तर एक हात सरळ रेषेत वर ठेवा.

शीर्षासन
हे आसन करण्यासाठी तुम्ही भिंतीचा सपोर्ट घेऊ शकता. यासाठी सर्वात दोन्ही गुडघे आणि कोपर जमिनीवर टेकवा. यानंतर कोपरांच्या मधोमध आपले डोके ठेवा. यानंतर हळुहळू दोन्ही पाय एका सरळ रेषेत घेत भिंतीला टेकवण्याचा प्रयत्न करा.