Cinnamon Tea For Sleep: हल्ली धावपळीच्या काळात लोकांमध्ये निद्रानाशानी समस्या सामान्य झाली आहे. बरेच लोक वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करतात; परंतु झोपण्याचा प्रयत्न करूनही त्यांना झोप येत नाही. जर तुम्हालाही अशा समस्येचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही झोपण्यापूर्वी दालचिनीचा चहा घेऊ शकता.
दालचिनीच्या चहाचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे
तणाव कमी करण्याची क्षमता
बहुतेक घरांमध्ये दालचिनीचा वापर अन्नाची चव वाढविण्यासाठी केला जातो. परंतु, तुम्ही त्याच्या मदतीने चहादेखील बनवू शकता. दालचिनीमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिटंट्स असतात, जे तणाव कमी करतात आणि मनाला शांत करतात.
जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी सुमारे ३० मिनिटे अगोदर दालचिनीचा चहा घेतला, तर तुमचे शरीर तणावमुक्त होते. त्याच्या सेवनाने दिवसभराचा थकवाही कमी होतो. रात्रीच्या वेळी वारंवार झोप न येण्याची समस्याही त्यामुळे दूर होते.
रक्तातील साखर नियंत्रित राहते
दालचिनीमध्ये पॉलीफेनॉल, अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि फायबर, लोह, कॅल्शियम, तांबे, फॉस्फरस, मॅंगनीज व जस्त असे अनेक घटक असतात, जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात.
दालचिनीचा चहा कसा बनवायचा?
दालचिनीचा चहा बनविण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी गरम करा. आता त्यात दालचिनीचा एक छोटा तुकडा घालून, तो मंद आचेवर ५-७ मिनिटे उकळवू शकता. त्यानंतर हा चहा गाळून प्या. दालचिनीच्या या चहाचे सेवन केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते.