कढीपत्ता आणि बडीशेप हे दोन्हीही शरीरासाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. कढीपत्ता आणि बडीशेप हे दोन्हीही भारतीय स्वयंपाकघरातील सामान्य मसाले आहेत, परंतु हे दोन्ही केवळ अन्नाची चव आणि सुगंध यासाठीच ओळखले जात नाहीत तर अनेक आजारांवर देखील खूप फायदेशीर आहेत. या कढीपत्ता अन् बडीशेपचे पाणी हे शरीरासाठी औषधासारखे काम करते. आयुर्वेदिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज कढीपत्ता आणि बडीशेप पाणी प्यायल्याने पचन सुधारतेच असे नाही तर शरीरातील चयापचय देखील वाढते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. याशिवाय, हे मिश्रण शरीराला आतून स्वच्छ करण्यासाठी, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. प्रमाणित आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ नंदिनी म्हणाल्या की, “दररोज सकाळी कढीपत्ता आणि बडीशेप पाणी पिण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. “
पोषणतज्ज्ञ नंदिनी के सांगतात, कढीपत्ता आणि बडीशेप पाणी हा एक असा उपाय आहे जो शरीराच्या अनेक पातळ्यांवर प्रभावी आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, त्वचेची चमक वाढवायची असेल, पचन सुधारायचे असेल किंवा साखर नियंत्रित करायची असेल, तर हे नैसर्गिक पेय तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग असू शकते.
वजन कमी करण्यासाठी प्रभावी (Effective For Wight Loss)
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कढीपत्ता आणि बडीशेप पाणी रिकाम्यापोटी सेवन करा. कढीपत्ता शरीरातील फॅट्सचा वापर करून ऊर्जा निर्माण करते आणि बडीशेप भूक नियंत्रित करते. हे दोन्ही पाणी चयापचय गतिमान करते, जी कॅलरीज बर्न करण्याची प्रक्रिया आहे. हे दोन्ही वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील.
पचनक्रिया सुधारते (Improve Digestion)
जर तुम्ही पचनासंबधीत समस्यांमुळे अडचणीत असाल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्ता आणि धन्याचे पाणी सेवन करा. बडीशेपच्या सेवनामुळे गॅस, पोटात येणारे पेटके(क्रॅप्म) आणि जळजळ या त्रासापासून आराम मिळतो. कढीपत्ता यकृताला विषमुक्त करते आणि पाचक रसांचा स्राव वाढवते. नियमित सेवनाने पचनक्रिया मजबूत होते.
रक्तातील साखर नियंत्रण (Control Blood Sugar)
कढीपत्त्याची पाने आणि बडीशेपचे पाणी देखील रक्तातील साखर नियंत्रणासाठी फायदेशीर आहे. कढीपत्त्यामध्ये मधुमेहविरोधी संयुगे असतात जे रक्तातील साखरेच्या वाढीस प्रतिबंध करतात. याशिवाय, बडीशेपमध्ये इन्सुलिन संवेदनशीलता देखील सुधारते. हे दोन्ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात.
त्वचा आणि केसांचे आरोग्य (Improve Hair and Skin Health)
कढीपत्त्याची पाने आणि बडीशेपचे पाणी त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कढीपत्त्यामुळे केस गळणे थांबते आणि त्वचा चमकदार होते. बडीशेपचे पाणी त्वचेला विषमुक्त करते, मुरुमे आणि ब्लॅकहेड्स कमी करते.
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी वापर (Helps to reduce Cholesterol)
कढीपत्त्यामध्ये कमी कोलेस्टेरॉल असते आणि बडीशेप रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यास मदत करते, ज्यामुळे शरीर हृदयरोगाशी जोडले जाते.