उन्हाळा जोरात सुरू आहे, त्यामुळे भरपूर पाणी आणि पेय पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कडक सूर्यप्रकाश आणि वाढता पारा यामुळे लोक तहान शमवण्यासाठी फ्रीजचे थंड पाणी पितात. थंड पाणी तहान शमवण्यासाठी आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. थंड पाणी प्यायल्याने शरीराला लगेच थंडावा मिळतो आणि शरीर ताजेतवाने राहते. पण काही लोकांचा असा विश्वास आहे, की तहान शमवण्यासाठी थंड पाणी पिणे चांगले नाही. उन्हाळ्यात थंड पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे की हानिकारक आहे हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

पाणी पिण्याचे फायदे

पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि चयापचय वाढतो. पाण्यामुळे शरीराचे तापमान सामान्य राहते, तसेच शरीराचे अवयव निरोगी राहतात. पाण्याचे सेवन केल्याने डिहाइड्रेशन टाळता येते आणि अनेक प्रकारच्या समस्यांपासून सुटका होते. तसेच पूरेपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचा तजलेदार होते.

Kidney Health : उभे राहून पाणी प्यायल्यास किडनी खराब होण्याचा धोका, जाणून घ्या योग्य पद्धत

थंड पाणी पिणे टाळावे का?

मसिना हॉस्पिटलचे सल्लागार पल्मोनोलॉजिस्ट डॉ. सोनम सोलंकी यांच्या मते, साधारणपणे आपल्या शरीराचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस असते, त्यामुळे आपण थंड पाणी प्यायल्यास, शरीर ऊर्जा खर्च करून हे तापमान नियंत्रित करू शकते. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास थंड पाण्यामुळे शरीरात असंतुलन होऊ शकते आणि पचनक्रिया मंदावते.

तसेच जेवताना काही जणांना थंड पाणी प्यायची सवय असते. जेवताना थंड पाणी प्यायल्यास आपले शरीर शरीराचे तापमान नियंत्रित करणारी ऊर्जा वापरण्यास सुरुवात करते, जी पचन आणि पोषक द्रव्ये शोषण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे जेवताना थंड पाणी पिणं टाळावं. कारण यामुळे घसा खवखवणे आणि नाकाचा त्रास होऊ शकतो.

Summer Tips: उन्हाळ्यात परफेक्ट लूक अन् गर्मीपासून बचाव; कुर्त्यांचे लेटेस्ट ट्रेंड पाहिलेत का?

श्वेता महाडिक, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, फोर्टिस हॉस्पिटल वेलनेस यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने कडक उन्हाळ्यात थंड पाणी पिण्याचे कोणतेही विशिष्ट धोके नसतात. २०१२ मधील एका अभ्यासानुसार, व्यायामादरम्यान थंड पाणी पिणे शरीराला जास्त गरम होण्यापासून दूर ठेवण्यास मदत करते. थंड पाणी पिण्याने व्यायाम चांगला होतो.

तर, गरम पाणी हा एक चांगला पर्याय आहे का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुर्वेदिक डॉक्टर दिक्षा भावसार यांच्या मते बर्फासारखे थंड पाणी पिणे टाळावे. थंड पाणी पिण्याऐवजी खोलीच्या तापमानानुसार कोमट पाणी प्यावे. गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण याचा अर्थ असा नाही की थंड पाण्यामुळे आरोग्याला हानी पोहोचते. खोलीच्या तापमानानुसार पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो. पाणी शरीराला हायड्रेट ठेवते तसेच शरीराला ताजेतवाने वाटते. पाणी तुमची पचनसंस्था आणि आरोग्य बिघडवते असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या.