Drinking Water: जेव्हा आपण अन्न खात असतो त्याचवेळी पचनक्रिया सुरू होते. अन्न पोटात गेल्यावर गैस्ट्रिक रस अन्न पचनासाठी मदत करते. या प्रक्रियेमध्ये पाणी प्यायलास अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. या अवस्थेत पचनाच्या समस्या उद्भवतात. दीर्घकाळ पचनाची समस्या राहिल्याने बद्धकोष्ठतेचा धोका वाढतो. यासाठी जेवताना किंवा जेवण करण्यापूर्वी पाणी पिऊ नये असे सतत सांगितले जाते. त्याच वेळी, जेवण करताना जास्त किंवा वारंवार पाणी पिण्यामुळे मळमळ, छातीत जळजळ आणि ढेकर येणे इत्यादी पचन समस्या देखील उद्भवतात. यासाठी आरोग्य तज्ज्ञ जेवताना पाणी न पिण्याचा सल्ला देतात. याशिवाय अन्न खाताना पाणी प्यायल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. जाणून घेऊया या समस्यांबद्दल.

वजन वाढू शकते

तज्ज्ञांच्या मते, जेवताना पाणी प्यायल्याने वजन वाढण्याचा धोका वाढतो. जेव्हा आपण अन्न खातो आणि जेवताना फक्त पाणी पितो तेव्हा अन्नाचे पचन नीट होत नाही. या काळात न पचलेल्या अन्नाचे फॅटमध्ये रूपांतर होते. त्यामुळे वजन वाढू लागते.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

( हे ही वाचा: Heart Disease: निरोगी राहण्यासाठी हृदयरोग्यांनी ‘या’ गोष्टी नाश्त्यात खाव्यात; मिळेल भरपूर फायदा)

इन्सुलिन वाढते

जेवण करताना जास्त किंवा वारंवार पाणी प्यायल्याने इन्सुलिनची पातळी वाढते. यामुळे शरीरात चरबी साठू लागते.

सवय कशी कमी करावी

  • अन्न खाताना पाणी पिण्याची सवय सोडवण्यासाठी खारट पदार्थांचे सेवन कमी करावे. मीठामध्ये सोडियम असते त्यामुळे तहान जास्त लागू शकते. त्यामुळे असे पदार्थ खाणे सहसा टाळावे. तसेच तेलकट आणि मसालेदार पदार्थ देखील खाऊ नये.
  • जेवताना अन्न नीट चावून खावे. अन्न नीट चावून खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते. यामुळे अॅसिडिटी आणि ब्लोटिंगचा धोका राहत नाही. त्यामुळे जेवताना अन्न नीट चावून खावे असा सल्ला डॉक्टर देखील देतात.