scorecardresearch

चेहऱ्यावरील ‘या’ लक्षणांवरून ओळखू शकता तुम्ही किती पाणी पिता, कसे ते जाणून घ्या

शरीरात पाण्याची कमरता निर्माण झाल्यास त्याची लक्षणे तुमच्या चेहऱ्यावर दिसतात.

dullness to dry skin dehydration symptoms on skin in marathi
शरीरात पाण्याची कमतरतेमुळे चेहऱ्यावर दिसतात ही लक्षणे (फोटो: फ्रीपीक)

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास त्याचा विविध अवयवांवर परिणाम होतो. यात केवळ तुमच्या पचनसंस्थेवरचं नाहीतर आतड्यांच्या हालचाली आणि बीपीवरही परिणाम होऊ शकतो. पाण्याच्या कमतरतेमुळे तुमची रक्ताभिसरण क्षमता बिघडते. ज्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यात चेहऱ्याच्या त्वतेवरून तुम्ही किती पाणी पितात हे ओळखू शकता.

चेहऱ्यावर दिसतात डिहायड्रेशनची लक्षणे

१) गालावर भेगा जाणे

पाण्याच्या कमतरतेमुळे तुमच्या गालावर भेगा पडू शकतात.या पडलेल्या भेगांवरून तुम्ही शरीरात हायड्रेशनची कमतरता आहे हे ओळखू शकता.

२) त्वचा कोरडी आणि निस्तेज होणे

जर तुमच्या त्वचेची चमक गेली असेल आणि रंग खूप काळा वाटत असेल तर ते पाण्याच्या कमतरतेमुळे होऊ शकते. याशिवाय त्वचेचा निस्तेज आणि चेहऱ्यावर थकवा दिसत असेल तर तेही शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे लक्षण आहे.

३) डोळ्यांखाली काळी वर्तुळे

डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता. यासोबत त्याचा तुमच्या रक्ताभिसरणावर परिणाम होतो. यामुळे दिवसभर पुरेसे पाणी प्यावे जेणेकरून डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसणार नाहीत.

४) फाइन लाइन्स आणि सुरकुत्या

फाइन लाइन्स आणि सुरकुत्या ही लक्षणं तुमच्या शरीरात कोलेजन आणि हायड्रेशनची कमतरता असल्यामुळे दिसतात. यामुळे दिवसभर पुरेसे पाणी प्यायले पाहिजे.

५) कोरडेपणा आणि खाज सुटणे

कोरडेपणा आणि खाज सुटणे ही दोन्ही लक्षणे पाण्याच्या कमतरतेमुळे दिसतात. यामुळे रक्ताभिसरण खराब होते. शरीरात ओलावा नसल्यामुळे कोरडेपणा येतो, जेव्हा कोरडेपणा वाढतो तेव्हा खाज सुटते. म्हणून, दररोज ८ ग्लास पाणी पिऊ, डिहायड्रेशनची समस्या टाळा आणि आपली त्वचा निरोगी ठेवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 18:47 IST

संबंधित बातम्या