Early Symptoms of Cancer : कर्करोग हा आजार झपाट्याने वाढत असून हा एक अतिशय धोकादायक आजार आहे. या आजारात शरीरामधील पेशींची अमर्याद वाढ होते, जे कालांतराने धोकादायक ठरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार हा आजार जगभरात मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. कर्करोग या आजारचेही अनेक प्रकार असून बहुसंख्य लोक प्रोस्टेट, पोट, कोलोरेक्टल, यकृत, थायरॉईड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाने बाधित आहेत. महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा आणि स्तनांच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो. बरेचदा या आजाराची लक्षणे लगेच समजत नाहीत. त्यामुळेच कर्करोग झाला आहे हे समजण्यासाठी खूप वेळ जातो. म्हणूनच या आजाराच्या लक्षणांविषयी माहीत असणे आवश्यक आहे. आज आपण कर्करोगाच्या सुरुवातीच्या संभाव्य लक्षणांबद्दल जाणून घेऊया.

  • योनीमधून रक्तस्त्राव

एका निरोगी महिलेला मासिक पाळीच्या वेळी रक्तस्त्राव होणे अत्यंत सामान्य गोष्ट आहे. मात्र यानंतरही योनीमधून रक्तस्त्राव होणे ही धोक्याची घंटा असू शकते. हे गर्भाशयाच्या (Uterine Cancer) कर्करोगाचे लक्षण असू शकते.

Health Tips : सकाळी नाही, तर रात्री झोपण्यापूर्वी प्या गरम पाणी; मिळतील ‘हे’ चार आश्चर्यकारक फायदे

  • खोकला

बदलणाऱ्या ऋतूमध्ये सर्दी-खोकला यासारखे आजार होतात. मात्र एक महिन्याहून अधिक काळ तुम्हाला खोकल्याचा त्रास होत असेल तर हे चिंताजनक आहे. हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्यामुळे ही समस्या एका महिन्यापेक्षा जास्त काळ राहिली तर लगेचच टेस्ट करून घ्या.

  • डिप्रेशन

अनेकदा आपल्याला कौटुंबिक, सामाजिक किंवा आर्थिक कारणांमुळे ताण-तणावाला सामोरे जावे लागते. याचे प्रमाण वाढल्यास याला आपण डिप्रेशन असे म्हणतो. मात्र हे कर्करोगाचेही लक्षण असू शकते. ब्रेन ट्यूमर झाल्यावर सामान्यत: टेंशन, ताण आणि डिप्रेशन ही संभाव्य प्राथमिक लक्षणे असू शकतात.

  • गुदद्वारातून रक्त येणे

एखाद्या व्यक्तीला पाइल्स म्हणजेच मुळव्याधीचा त्रास असेल तर त्याच्या गुदद्वारातून रक्त येऊ लागते. परंतु, तुम्हाला हा त्रास नसेल तरीही तुमच्या विष्ठेतून रक्त येत असेल तर हे गुदाशय किंवा कोलन कर्करोगाचे लक्षण असू शकते.

मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास दूर होईल ताण-तणाव; जाणून घ्या शरीराला होणारे इतर फायदे

  • वजन कमी होणे

जिममध्ये वर्कआउट न करता किंवा कोणताही जड व्यायाम न करताही जर तुमचे वजन कमी होत असेल, तर हे कर्करोगाचे लक्षण असू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)