हिरव्या पालेभाज्यांचा आपल्या आहारात समावेश केल्याने शरीराला अनेक प्रकारचे पोषक तत्त्व मिळतात. अशाच भाज्यांपैकी पालक ही एक अशी भाजी आहे जी जवळपास संपूर्ण वर्षभर मिळते आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. पालक या भाजीला “पोषक तत्वांचं पॉवरहाऊस” म्हणतात कारण यात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, सी, के फोलेट आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. ही सर्व तत्वं एकत्र येऊन हाडं मजबूत ठेवतात, रक्तातील कमतरता दूर करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
गॅस्ट्रो लिव्हर हॉस्पिटलचे डॉक्टर व्ही. के. मिश्रा यांच्या मते, पालक ही हाडांच्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर हिरवी पालेभाजी आहे. यात असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि व्हिटॅमिन के हाडांमधील कॅल्शियमचं संतुलन राखतात आणि हाडं घट्ट करतात.
पालक हाडांना कसं मजबूत करतो? (How Spinach Strengthens Bones)
दररोजच्या आहारात पालकाचा समावेश केल्यास हाडांमध्ये नवीन हाडे निर्माण करण्याऱ्या पेशी तयार होण्याची गती वाढते. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजाराचा धोका कमी होतो. पालकातील अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सपासून हाडं आणि सांधे यांचे संरक्षण करतात, तर त्यातील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म सांध्यांच्या वेदना आणि सूज कमी करण्यात मदत करतात.
शरीरातील पाण्याच्या पातळीचं संतलून टिकवतो (Keeps the Body Hydrated)
पालकात जवळपास ९०% पाणी असतं. त्यामुळे शरीरातील पाण्याच्या पातळीचं संतलून टिकवून ठेवण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावतो. नियमित सेवनामुळे स्किन आणि मेटाबॉलिझम हेल्थ सुधारते. उन्हाळा असो वा हिवाळा, पालक शरीराला नेहमी फ्रेश आणि ऊर्जावान ठेवतो.
भूक नियंत्रित आणि वजन कमी (Controls Appetite & Aids Weight Loss)
पालकातील थायलाकोइड्स (Thylakoids) नावाचं संयुग भूक कमी करतं आणि परिपूर्णतेची भाववा निर्माण करणारे संप्रेरक(हार्मोन्स( वाढवतं. त्यामुळे अतिखाण्याची वाईट सवय टाळली जाते आणि वजन नियंत्रणात राहातं. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी पालक उत्तम पर्याय आहे.
ऑस्टिओपोरोसिसपासून बचाव (Prevents Osteoporosis)
पालकात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के मुबलक असतात. ही तिन्ही तत्त्वं हाडांची मजबुती राखतात आणि हाडांची पुन्हा निर्मितीची होण्याची प्रक्रिया सुधारतात. नियमित सेवनामुळे हाडांची झीज थांबते आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.
रक्तातील लोह वाढवतो (Boosts Iron Levels & Prevents Anemia)
पालक हा लोहचा उत्तम स्रोत आहे. यामुळे शरीरात लाल रक्त पेशी मजबूत होतात आणि ऑक्सिजनचं वहन नीट होतं. थकवा, चक्कर येणं, अशक्तपणा आणि अॅनिमिया सारख्या समस्यांपासून बचाव होतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढवतो (Strengthens Immunity)
पालकात व्हिटॅमिन इ, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची रोग प्रतिकार शक्ती मजबूत करते. हे घटक मुक्त रॅडिकल्स, व्हायरस आणि बॅक्टेरिया यांच्याशी लढण्याची ताकद देतात आणि वारंवार होणाऱ्या आजारांपासून शरीराचं रक्षण करतात.
गर्भवतींसाठी उपयुक्त (Beneficial for Pregnant Women)
पालकातील फोलिक अॅसिड (Folate) गर्भातील बाळाच्या मेंदू व मज्जासंस्थेच्या विकासासाठी आवश्यक असतो. यामुळे न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स सारख्या जन्मजात विकारांचा धोका कमी होतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी आहारात पालकाचा समावेश नक्की करावा.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर (Good for Eye Health)
पालकात ल्यूटिन, झीएक्सँथिन, व्हिटॅमिन ए आणि ली असतात जे डोळ्यांचं आरोग्य टिकवतात. हे घटक मोतीबिंदू आणि रातांधळेपणापासून संरक्षण देतात आणि वयासह होणाऱ्या मॅक्युलर डिजनरेशन(Macular degeneration) चा धोका कमी करतात.
मुक्त रॅडिकल्सपासून बचाव करतात (Fights Free Radicals)
पालकातील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्सशी लढतात. त्यामुळे डायबिटीज, कॅन्सर, पार्किन्सन यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. हे शरीराच्या पेशीना अकाली वृद्ध होण्यापासूनही रोखतात.
हृदयासाठी हितकारक (Supports Heart Health)
पालक हा ऑर्गॅनिक नायट्रेट्सचा उत्तम स्रोत आहे, जो रक्तदाब कमी करण्यात मदत करतो. तसेच त्यातील पोटॅशियम हृदयाची कार्यक्षमता सुधारतं आणि हृदयविकारांपासून संरक्षण करतं.
सूज आणि वेदना कमी करतो (Reduces Inflammation & Pain)
पालकातील अँटी-इंफ्लेमेटरी कंपाउंड्स शरीरातील सूज किंवा दाह कमी करतात. त्यामुळे सांध्यातील वेदना, हृदयरोग आणि इतर इंफ्लेमेटरी डिसऑर्डर्सपासून आराम मिळतो.
आहारात पालकचे सेवन कसे करावे? (How to Include Spinach in Diet)
पालकाचं सेवन कच्चं, उकळून, परतून किंवा शिजवून कोणत्याही प्रकारे करता येतं. ते सॅलड, सूप, स्मूदी किंवा भाजीच्या स्वरूपात खाऊ शकतो. रोजच्या आहारात थोडासा पालक असणं म्हणजे आरोग्याला मिळणारी नैसर्गिक ढालच!
