कढीपत्ता हा केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही अमृतासमान आहे. दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. १०० ग्रॅम कढीपत्यामध्ये तब्बल ८३० मिग्रॅ कॅल्शियम असते, जे हाडे, दात आणि सांधे मजबूत करण्यासाठी उत्तम नैसर्गिक स्रोत आहे. यामध्ये कॅल्शियमबरोबरच आयर्न, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन सीही मुबलक प्रमाणात असते. तसेच दाहक विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मही आहेत.
एम्सचे माजी कन्सल्टंट आणि साओल हार्ट सेंटरचे फाउंडर डॉ. बिमल झाजर यांच्या मते, कढीपत्ता वजन कमी करण्यास मदत करतो तसेच शरीर डिटॉक्स करण्याचे काम करतो. यातील गुणधर्म फ्री रॅडिकल्सशी लढा देतात आणि शरीर निरोगी ठेवतात. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी कढीपत्याचा समावेश आहारात करणे अत्यंत फायदेशीर ठरते.
कढीपत्ता कोणत्या फूड्सबरोबर खाल्ल्यास आहारातील कॅल्शियमचे प्रमाण वाढेल?
१. तिळाबरोबर कढीपत्ता
तिळामध्ये मुबलक कॅल्शियम असते. एका टेबलस्पून (९ ग्रॅम) तिळामध्ये सुमारे ८८ मिग्रॅ कॅल्शियम मिळते. तिळ आणि कढीपत्ता भाजून चटणी किंवा मसाल्यामध्ये एकत्र करून खाल्ल्यास हाडे मजबूत होतात.
२. नाचणीबरोबर कढीपत्ता
१०० ग्रॅम नाचणीमध्ये सुमारे ३४४ मिग्रॅ कॅल्शियम असते. नाचणीचे डोसे, पोळी किंवा पेजमध्ये भाजलेला कढीपत्ता मिसळून खाल्ल्यास पोषणमूल्य अधिक वाढते.
३. पनीरबरोबर कढीपत्ता
१०० ग्रॅम पनीरमध्ये सुमारे २००–२५० मिग्रॅ कॅल्शियम असते. पनीर भुर्जी किंवा करीमध्ये कढीपत्ता परतून टाकल्यास चव आणि कॅल्शियम दोन्ही मिळते.
४. बदामाबरोबर कढीपत्ता
१०० ग्रॅम बदामामध्ये सुमारे २६४ मिग्रॅ कॅल्शियम असते. बदाम आणि कढीपत्ता वाटून चटणी तयार करा किंवा सलाडवर शिंपडून खा.
५. शेवग्याच्या पानांबरोबर कढीपत्ता
१०० ग्रॅम शशेवग्याच्या पानांमध्ये सुमारे ४४० मिग्रॅ कॅल्शियम मिळते. शेवग्याच्या पाने व कढीपत्याची भाजी, डाळ किंवा स्टर-फ्राय करून खाल्ल्यास हाडे लोखंडासारखी मजबूत होतात.