Skin Care : तुम्हालाही तुमची त्वचा नेहमी तरुण, चमकदार आणि मुलायम राहावी असे तुम्हाला वाटते का? मग ही फळे रोज खाण्यासोबतच त्यांच्या सालीचाही समावेश तुमच्या त्वचेची निगा राखण्यासाठी करा. अशी काही फळे आहेत जी केवळ चवीलाच अप्रतिम नाहीत तर आरोग्य आणि त्वचा या दोन्हींसाठी खूप फायदेशीर आहेत. या फळांच्या सालींमुळे तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य अनेक पटींनी वाढू शकते. या फळांच्या सालीमध्ये असे गुणधर्म असतात जे तुमच्या त्वचेच्या समस्या दूर करतात. चला जाणून घेऊया या फळांबद्दल…

संत्री

Shrimant Dagdusheth Halwai Ganpati latest news
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल ११०० नारळांचा महानैवेद्य
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
Is thirst a good predictor of dehydration
तहान लागते म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा…
yoga poses to relieve gas
Health Special: पोटातील गॅसवर योगासनांचा जालीम उपाय; नेमके काय कराल? – भाग २
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…
Benefits of Sunflower Seeds for hair
Sunflower Seeds For Hair : केस खूप गळतात? मग सूर्यफुलाच्या बियांचा करा वापर, सगळ्या समस्या होतील झटक्यात दूर
loksatta chaturang article
जिंकावे नि जगावेही : जगण्याचे सशक्त मार्ग

संत्री खाणे खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फायबर इत्यादी अनेक पोषक घटक आढळतात. यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.याशिवाय संत्र्याची साल चेहऱ्यावर लावल्याने त्वचेसाठी फायदा होतो. सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड असते जे त्वचेसाठी अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. त्यामुळे सुरकुत्या कमी होण्यास आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

केळी

केळीचे फायदे सर्वांनाच माहित आहेत पण आज जाणून घ्या त्याच्या सालीचे फायदे. केळी पिकल्यावर त्याची साल काढून केळी खावी आणि साल चांगली बारीक करून घ्यावी. नंतर ही पेस्ट चेहऱ्यावर आणि हातावर लावा. काही वेळाने ही पेस्ट सुकल्यावर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करा आणि हलक्या हातांनी मसाज करा. असे सतत केल्याने तुमची त्वचा मऊ, कोमल आणि चमकदार राहील. केळीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि झिंक सारखे घटक आढळतात ज्यामुळे त्वचा निरोगी राहते. त्यामुळे केळीच्या सालीने चेहरा आणि त्वचा या दोन्हींचे सौंदर्य वाढवता येते.

पपई

पपई खायला जितकी स्वादिष्ट आणि फायदेशीर आहे, तितकीच तिचे त्वचेवर वापरण्याचे अनेक फायदे आहेत. पपईच्या रसामध्ये एक नैसर्गिक एंझाइम आहे. हे एन्झाइम्स त्वचेतून मृत आणि खराब झालेल्या पेशी साफ करण्यास मदत करतात. नवीन आणि निरोगी पेशींच्या निर्मितीला देखील प्रोत्साहन देतात. पपई बारीक करुन चोळल्याने चेहऱ्यावरील डाग हळूहळू नाहीसे होतात आणि त्वचा मुलायम आणि चमकदार बनते. पपईच्या सालीचा नियमित वापर केल्यास त्वचेच्या खराब समस्यांपासून सुटका मिळू शकते.त्यामुळे पपई खाण्यासोबतच त्याच्या सालीचाही वापर करा.

हेही वाचा >> पाणी, दुधासह ‘हे’ ८ सुपरफूड्स दातांना करतील चकचकीत; कीड लागणे, दात दुखी व दुर्गंधीपासून व्हा मोकळे

सफरचंद

सफरचंद हे एक स्वादिष्ट आणि निरोगी फळ आहे जे आपण जवळजवळ दररोज खातो. सफरचंदाच्या सालीमध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात जे चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. सफरचंदाच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-एजिंग गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. हे त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि त्यांना निरोगी ठेवतात. त्याची साल बारीक करून फेस पॅक म्हणून चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या आणि रेषा कमी होऊ लागतात. त्यामुळे त्वचा घट्ट, टवटवीत आणि तरुण राहण्यास मदत होते.