Guava in winter : तुम्हाला पेरू खायला आवडतात का? असं असेल तर ही योग्य वेळ आहे. कारण, हिवाळ्यात पेरू खाणे अनेकांना आवडते. त्याची चव मनाला प्रसन्न करते. तसेच पेरू खाण्याचे स्वतःचे काही खास फायदे आहेत. परंतु, चुकीच्या वेळी पेरू खाल्ल्याने तुम्ही आजारीही पडू शकता. तुम्हाला बराच काळ सर्दी-खोकल्याचा त्रासही देऊ शकता. तुम्हाला पेरू खाण्याची योग्य वेळ माहित असायला हवी. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वजन कमी करण्यासाठी

पेरुच्या बियांचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. कारण पेरुत कोलेस्ट्रोलची मात्रा खूप कमी आहे. बियांमध्ये फायबर मोठ्याप्रमाणात असते त्यामुळं पेरु खाल्ल्याने पोट भरल्यासारखे राहते. त्यामुळं जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर पेरु नक्की खायला पाहिजे.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरु खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीनची मात्रा अधिक असते. जी शुगर आणि शुगर कपाउंड तोडण्यास मदत करते. त्यासाठी पेरुचे सेवन केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो.

हेही वाचा >> हिवाळ्यात रिकाम्या पोटी कढीपत्ता खाण्याचे जबरदस्त फायदे; केसगळतीसह ‘हे’ विकार होतील दूर

पेरु कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करतात. पेरूच्या पानांच्या तेलामध्ये कर्करोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी द्रव्ये असतात असे आढळून आले आहे. पेरूमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहेत जे तुमच्या शरीरातील वाईट जीवाणू आणि विषाणू नष्ट करण्याचे काम करतात. पेरू खाल्ल्यानं रक्तामध्ये साखरेचं प्रमाण कमी होतं. सोबतच पेरूचा अर्क रोज सकाळ-संध्याकाळ घेतल्यानं पचनक्रीया व्यवस्थित होते.

हिवाळ्यात पेरु खाण्याची उत्तम वेळ

हिवाळ्यात पेरू खाण्याची उत्तम वेळ उन्हाच्या वेळी किंवा सकाळी ८ ते दुपारी ३ अशी असते. यानंतर पेरू खाणे टाळा कारण संध्याकाळीर थंडी वाढते आणि मग आजारी पडण्याचा धोका वाढतो.

रोज किती पेरु खावे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये साधारणपणे १०० ते १५० ग्राम पेरू खाणं गरजेचे आहे. पेरूमध्ये भरपूर खनिजे असतात. पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखी खनिजे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असतात. पेरू हे फळ हिवाळ्यामध्येच येते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं हिवाळ्यात पेरू खाणं गरजेचं आहे, असं आहारतज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी सांगितलं आहे.