scorecardresearch

Side Effects of eating Onion: गरजेपेक्षा जास्त कांदा खाणे ठरू शकते हानिकारक; जाणून घ्या याचे तोटे

जर तुम्ही जास्त प्रमाणात कांदे खाल्ले तर रक्तातील साखर वाढून पोट खराब होण्याची समस्या उद्भवू शकते.

Side Effects of eating Onion
जाणून घेऊया कांद्याच्या अतिसेवनाने इतर कोणते तोटे होऊ शकतात. (Photo : Pexels)

प्रत्येकाला माहित आहे की कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन नेहमीच समस्या निर्माण करते. तीच स्थिती कांद्याची आहे. जर तुम्ही ते जास्त प्रमाणात खाल्ले तर रक्तातील साखर वाढून पोट खराब होण्याची समस्या उद्भवू शकते. चला तर मग जाणून घेऊया कांद्याच्या अतिसेवनाने इतर कोणते तोटे होऊ शकतात.

अ‍ॅसिडिटीची समस्या जाणवू शकते

कांद्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोज जास्त असते. याशिवाय यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते, जे काहींना चांगले पचत नाही. अशा स्थितीत अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

मधुमेहाच्या रुग्णांना धोका

कच्चा कांदा रक्तातील साखरेसाठीही फायदेशीर नाही. मधुमेहाच्या रुग्णांना कोणतीही गोष्ट जपून खावी लागते हे सर्वांनाच माहीत आहे. अशा स्थितीत कच्चा कांदा खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो.

तुम्हाला OK चा फुलफॉर्म माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक तथ्ये

छातीत जळजळ

जर तुम्हीही कच्चा कांदा मोठ्या प्रमाणात खात असाल तर काळजी घ्या, कारण यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या देखील होऊ शकते. म्हणूनच कच्चा कांदा जास्त प्रमाणात खाणे टाळा.

तोंडातून वास येऊ शकतो

यासोबतच तोंडातून दुर्गंधी येण्याची तक्रारही तुम्हाला जाणवू शकते. कच्चा कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येते हे सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत जास्त कांदा न खाण्याचा प्रयत्न करा, जरी तुम्ही खाल्ले तरी नंतर पाण्याने नीट चूळ भरा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eating too much onion can be harmful know the disadvantages of this pvp

ताज्या बातम्या