scorecardresearch

Premium

तुम्हाला OK चा फुलफॉर्म माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक तथ्ये

तुम्हाला माहित आहे का, ओके (OK) हा कोणताही शब्द नसून हे एका शब्दाचे संक्षिप्त रूप आहे?

आज आपण OK या शब्दाचा पूर्ण अर्थ जाणून घेणार आहोत. (Photo : Pexels)
आज आपण OK या शब्दाचा पूर्ण अर्थ जाणून घेणार आहोत. (Photo : Pexels)

सध्याच्या घडीला कोणत्याही संभाषणात बहुतांशवेळा वापरला जाणारा शब्द म्हणजे ‘ओके’. कोणत्याही गोष्टीवर सहमती दर्शवण्यासाठी आपण ‘ओके’ या शब्दाचा वापर करतो. हा एक शब्द संपूर्ण वाक्याचे काम करतो. परंतु तुम्हाला माहित आहे का, ओके (OK) हा कोणताही शब्द नसून हे एका शब्दाचे संक्षिप्त रूप आहे? आज आपण या शब्दाचा पूर्ण अर्थ जाणून घेणार आहोत.

OK हा एक ग्रीक शब्द आहे. याचा फुलफॉर्म आहे ‘Olla Kalla’. इंग्रजीमध्ये याचा अर्थ आहे All correct. ‘ओके’ची उत्पत्ती १८३ वर्ष आधी झाली, असे म्हणतात. अमेरिकन पत्रकार चार्ल्स गॉर्डन ग्रीन यांच्या कार्यालयातून या शब्दाचा वापर सुरू झाला. १८३९ मध्ये, चार्ल्स गॉर्डन ग्रीन यांनी कोणत्याही शब्दाऐवजी त्यांचे संक्षिप्त रूप वापरण्यास सुरुवात केली.

signature Psychology Personality Analysis By Signature of person graphology news
Personality Trait : स्वाक्षरीवरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव, तुमची स्वाक्षरी कशी आहे?
having baby or not decision parents
वळणबिंदू : मूल नको गं बाई
Optical Illusion IQ Test
Optical Illusion : सगळीकडे WOW दिसतंय ना? पण MOM कुठे? हुशार असाल तर १३ सेकंदात शोधून दाखवा
Shahi Pulao recipe
असा बनवा हॉटेलसारखा खमंग शाही पुलाव, लगेच ही सोपी रेसिपी जाणून घ्या

नखं कापल्यावर वेदना का होत नाहीत हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या यामागचं खरं कारण

सर्वात आधी ओके ‘ऑल करेक्ट’साठी शॉर्टकट म्हणून वापरलं गेलं. खरं तर तो व्याकरणावरचा उपहासात्मक लेख होता. हा लेख १८३९ मध्ये बोस्टन मॉर्निंग पोस्टमध्ये प्रकाशित झाला होता. त्यानंतर ‘OW’ सारखे शब्दही वापरात आले. याचा अर्थ ‘ऑल राइट’ असा होतो. १८४० मध्ये, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष मार्टिन व्हॅन बुरेन यांच्या पुनर्निवडणुकीच्या प्रचारात ‘ओके’ हा शब्द वापरण्यात आला. त्यानंतर तो शब्द जगभर लोकप्रिय झाला.

वास्तविक, व्हॅन बुरेनचे टोपणनाव ओल्ड किंडरहूक होते. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी निवडणूक प्रचारात ‘ओके’ हा शब्द वापरला. या काळात देशभरात ओके क्लब तयार करण्यात आले. आता ओके हा दुहेरी अर्थाचा शब्द झाला होता. याचा अर्थ ओल्ड किंडरहूक आणि ऑल करेक्ट असाही होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Do you know the full form of ok learn the interesting facts behind this pvp

First published on: 03-05-2022 at 10:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×