दातांचा पिवळेपणा, हिरड्यामधून रक्त येणे, सूज येणे किंवा तोंडाला दुर्गंधी येणे या सर्व समस्या केवळ दिसण्यात फरक निर्माण होतोच पण आपल्या एकूण आरोग्यावर परिणाम करतात. चुकीच्या आहारामुळे, दिवसातून दोन वेळा ब्रश न केल्याने, चहा-कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स, पानमसाला, तंबाखू आणि सिगारेटच्या सेवनामुळे दातांवर निकोटिनचा पातळ थर तयार होतो. त्यामुळे दात पिवळे पडतात आणि हिरड्या दुखतात.

व्हिटॅमिन सी, डी आणि कॅल्शियमची कमतरता असली तरी दात व हिरड्या कमकुवत होतात. तोंडाची स्वच्छता योग्य पद्धतीने न केल्यास बॅक्टेरियांचा थर वाढतो आणि त्यातून संसर्ग. सूज, वेदना व दुर्गंधी निर्माण होते. या सर्व समस्या टाळण्यासाठी आयुर्वेदिक आणि हर्बल उपचार अतिशय प्रभावी ठरतात.

रासायनिक टूथपेस्ट आणि माउथवॉशच्या तुलनेत आयुर्वेदिक जडीबुटी सुरक्षित, परवडणाऱ्या आणि दीर्घकाळ परिणामकारक आहेत. खाली दिलेल्या पाच हर्ब्सचा वापर केल्यास केवळ पिवळेपणा नाही तर दात आणि हिरड्याच्या इतर समस्याही कमी होऊ शकतात.

१. कडूलिंब (Neem) — नैसर्गिक टूथब्रश

आयुर्वेदात कडूलिंबाला तोंडाचे आरोग्य जपणारी सर्वोत्तम वनस्पती मानले जाते. कडूलिंबाच्या काड्यांनी दात स्वच्छ केल्यास बॅक्टेरियाची वाढ थांबते, प्लाक कमी होतो आणि हिरड्याची सूज व रक्तस्राव घटतो. कडूलिंबामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल घटक जिंजिवाइटिस आणि पेरियोडोंटल रोगांपासून संरक्षण करतात. संशोधनानुसार, कडूलिंबायुक्त टूथपेस्टने नियमित ब्रश केल्यास दात अधिक मजबूत होतात आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते.

२. लवंग (Clove) — वेदनांवर नैसर्गिक उपाय

लवंगमध्ये असलेले यूजेनॉल (Eugenol) हे नैसर्गिक वेदनाशामक आणि जंतुनाशक आहे. दातदुखी, सूज किंवा हिरड्यातील जळजळ यासाठी लवंगाचे तेल थेट लावल्यास किंवा पावडर स्वरूपात वापरल्यास त्वरित आराम मिळतो. संशोधनानुसार, लवंग ७० टक्क्यांपर्यंत हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करते, त्यामुळे ती घरगुती टूथपावडर किंवा माउथवॉशमध्ये वापरणे लाभदायक ठरते.

३. हळद (Turmeric) — नैसर्गिक दाहकता कमी करणारे औषध

हळदीत असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म हिरड्याची सूज कमी करतात, प्लाक रोखतात आणि तोंडातील जखमा भरून आणतात. हळदीचा पेस्ट टूथपेस्टमध्ये मिसळून वापरल्यास प्लाकचा रंग दिसून येतो आणि तो स्वच्छ करणे सोपे जाते. त्यामुळे दात स्वच्छ आणि मजबूत राहतात.

४. तुळस (Tulsi) — तोंडातील जंतूंचा नाश करते

तुळस ही नैसर्गिक अँटीसेप्टिक आणि अँटी-मायक्रोबियल वनस्पती आहे. तुलसीची पाने चघळल्याने किंवा तुलसी चहा घेतल्याने तोंडातील दुर्गंधी आणि किडलेले दात या समस्या दूर होतात. तुळसीतील अँटीऑक्सिडंट्स हिरड्याची सूज कमी करतात आणि Streptococcus mutans सारख्या जंतूंचा नाश करतात.

५. त्रिफळा (Triphala) — हिरड्या आणि दात दोन्हींसाठी टॉनिक

आवळा, हरड आणि बेहडा या तीन फळांपासून बनलेली त्रिफळा पावडर तोंडाच्या आरोग्यासाठी अद्वितीय आहे. यात असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक हिरड्या बळकट करतात आणि दातांतील बॅक्टेरिया कमी करतात.
त्रिफळा माउथवॉशने दिवसातून दोनदा गुळणी केल्यास प्लाक व सूज दोन्ही घटतात, आणि कोणताही साइड इफेक्ट होत नाही.

कसे वापरावे

  • दररोज सकाळी आणि रात्री या हर्ब्सपैकी एकाचा वापर करून दात स्वच्छ करा.
  • तोंड धुताना कोमट पाण्याचा वापर करा.
  • दिवसातून किमान दोन वेळा ब्रश करा आणि फ्लॉसिंग करा.
  • तंबाखू, सिगारेट, पानमसाला, आणि साखरयुक्त पदार्थ टाळा.

दात आणि हिरड्याच्या समस्या दिसायला किरकोळ वाटल्या तरी त्या आपल्या आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींचा नियमित वापर केल्यास रासायनिक टूथपेस्टची गरज कमी होते, आणि तुमचे दात पुन्हा मोत्यासारखे पांढरे व मजबूत दिसू लागतात.

टीप: कोणत्याही घरगुती उपचाराचा अवलंब करण्यापूर्वी दंततज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.