आज क्वचितच असा कोणी असेल जो स्मार्टफोन वापरत नसेल. काम असो किंवा करमणूक, आता आपण आपल्या बहुतेक कामांसाठी आपल्या मोबाईल फोनवर अवलंबून असतो आणि या कारणामुळेच आपण फोनशिवाय एक मिनिटही लांब राहू शकत नाही. तुम्ही देखील अनेक गोष्टींसाठी स्मार्टफोन वापरत असाल तर वेळेतच सतर्क होणे गरजेचे आहे. आज आपण अशा काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. स्मार्टफोन वापरताना तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या नाहीत तर तुम्हाला कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमरसारखे धोकादायक आजार होऊ शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्व स्मार्टफोन धोकादायक रेडिएशन उत्सर्जित करतात जे मानवांसाठी खूप धोकादायक आणि घातक ठरू शकतात. स्मार्टफोन वापरताना एक प्रकारचे रेडिओ फ्रिक्वेन्सी (RF) रेडिएशन उत्सर्जित होते, ज्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर खूप वाईट परिणाम होतो. मोबाईलमधून निघणाऱ्या या रेडिएशनमुळे माणसाला ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता ४० टक्क्यांनी वाढते. जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या स्मार्टफोन वापरताना लक्षात ठेवल्या पाहिजेत.

सतत चक्कर येणे असू शकते Brain Tumor चे लक्षण; आजाराच्या सुरुवातीला शरीर देते ‘हे’ संकेत

स्मार्टफोनमध्ये अनेक वैशिष्ट्ये आणि सुविधा असल्या तरीही फोन हा मुख्यतः कॉलवर बोलण्यासाठी वापरला जातो. सर्वप्रथम, फोनवर जास्त वेळ न बोलण्याचा प्रयत्न करा कारण बराच वेळ कॉलवर राहिल्याने रेडिएशन खूप वाढतात. तसेच, जर तुम्हाला फोनवर जास्त वेळ बोलायचे असेल तर तुम्ही फोन स्पीकरवर ठेवा आणि फोन तुमच्या शरीराशी थेट संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या. कारण दर ३० सेकंदाला फोन उष्णतेचे रेडिएशन उत्सर्जित करतो आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील प्रमुख अवयवांचे नुकसान होऊ शकते.

अशावेळी कधीही स्मार्टफोन वापरू नका

आपण कुठेही गेलो तरीही आपला स्मार्टफोन सहसा आपल्यासोबत असतो. परंतु काही ठिकाणे आहेत जिथे तुम्ही तुमचा फोन वापरू नये. जर तुम्ही बस, कार, ट्रेन इत्यादीमध्ये असाल आणि ते वाहन फिरत असेल, तर आवश्यक असेल तेव्हाच फोन वापरा. कारण यावेळी फोन सिग्नलसाठी अधिक सक्रिय असतो आणि त्यामुळे रेडिएशनही जास्त असते. एवढेच नाही तर तुमची कार कुठेतरी उभी असेल आणि तुम्ही त्यात बसलेले असाल, तेव्हाही स्मार्टफोन वापरणे खूप धोकादायक ठरू शकते. आजूबाजूची वाहने आणि तुमच्या वाहनातून निघणाऱ्या उष्णतेमुळे, फोनच्या बॅटरीच्या रेडिएशनमध्ये लक्षणीय वाढ होते आणि त्यामुळे रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन देखील मोठे होतात.

मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास दूर होईल ताण-तणाव; जाणून घ्या शरीराला होणारे इतर फायदे

आपल्यापैकी बहुतेकजण स्मार्टफोन वापरताना झोपी जातात आणि त्यामुळे फोन नेहमी त्यांच्या उशीजवळ असतो. रात्रीच्या वेळी स्मार्टफोनद्वारे उत्सर्जित होणारी रेडिएशन आणि सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड (EMF) झोपेचे चक्र विस्कळीत करू शकते, भीती वाढवू शकते, स्नायू दुखू शकतात आणि तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो. त्याचा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी तुमचा स्मार्टफोन तुमच्यापासून आणि बेडपासून दूर ठेवा.

जर तुम्ही आजारी नसाल आणि तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर त्यामागील एक कारण तुमचा स्मार्टफोनचा वापर असू शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Excessive use of smartphone can increase the risk of brain tumor do not ignore this things pvp
First published on: 23-07-2022 at 13:04 IST