Face Razor Safe Or Not For Woman : प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कमी अधिक प्रमाणात केस असतात. पण, या केसांमुळे चेहऱ्याचं सौंदर्य कमी होतं. मेकअप केल्यानंतरही ते दिसून येतात, त्यामुळे अनेक महिला पार्लरमध्ये जाऊन वॅक्सिंग किंवा थेड्रिंगच्या मदतीने ते काढून टाकतात. तर काही जणी लेझर ट्रीटमेंट घेतात. त्याचवेळी काही महिला, तरुणी चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी फेशियल रेझरचा वापर करतात. पण, चेहऱ्यावर अशाप्रकारे रेझर वापरणं योग्य आहे की नाही? असा प्रश्न अनेक महिलांना सतावतो.

कारण असे म्हटले जाते की, चेहऱ्यावरील केस रेझरच्या मदतीने काढल्यास पुन्हा दाट केस येतात. चेहरा काळपट दिसू लागतो. याच विषयावर त्वचारोगतज्ज्ञ जुशिया भाटिया सरीन यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी रेझरचा वापर करणं योग्य की अयोग्य हे सांगितले आहे.

फेशियल रेझर चेहऱ्यासाठी सुरक्षित आहे की नाही? (Face Razor For Women Safe)

त्वचारोगतज्ज्ञ जुशिया म्हणाल्या की, चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी फेशियल रेझर वापरणे सुरक्षित आहे. पण, या दरम्यान काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

१) योग्य ब्लेड निवडा

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी सिंगल किंवा डबल ब्लेड वापरा. याशिवाय तुम्ही डिस्पोजेबल ब्लेड असलेला रेझरदेखील वापरू शकता. यामुळे चेहऱ्यावर रेझर फिरवताना दुखापत होण्याची शक्यता कमी होते. पण, मल्टी-ब्लेड रेझरने त्वचेवर पुरळ किंवा जखम होण्याचा धोका जास्त असतो.

२) रेझर बदलत राहा

जर तुम्ही चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी रेझर वापरत असाल तर तुम्ही ब्लेड फक्त पाच ते सहा वेळा वापरावे. यामुळे त्वचेवर जळजळ होण्याचा धोका कमी होतो. तसेच कोणत्याही प्रकारची अॅलर्जी होत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३)ब्लेड कोरडे ठेवा

यासह डॉ. जुशिया म्हणाल्या की, चेहऱ्यावरील केस काढल्यानंतर रेझरचे ब्लेड पूर्णपणे स्वच्छ करून कोरडे करा. कारण ओल्या ब्लेडवर बॅक्टेरिया वाढण्याचा धोका जास्त असतो, ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्यादेखील वाढू शकतात.