How to identify fake paneer: दिवाळीच्या काळात बाजारपेठा अगदी सजलेल्या असतात. विविध प्रकारचे साहित्य घेण्यासाठी ग्राहकांची अगदी झुंबड उडालेली असते. खाद्यपदार्थांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असते. नेमका याचाच फायदा काहीजण घेतात. वाढत्या मागणीमुळे खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जाते. दिवाळीच्या काळात बाजारात अनेकदा बनावट पनीर खरेदी केली जाते. बनावट पनीर खाल्ल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. तेव्हा पनीर विकत घेताना शुद्ध पनीर आणि बनावट पनीर यातला फरक कसा ओळखाल ते आता जाणून घेऊ…
पाण्यात विरघळणे
शुद्ध आणि बनावट पनीर ओळखण्यासाठी ते कापून पाण्यात टाका. जर पनीर पाण्यात विरघळत असेल तर ते बनावट आहे. म्हणजेच ते वनस्पती तेलाने तार केलेले पनीर गरम पाण्यात विरघळते, याउलट शुद्ध पनीर पाण्यात विरघळत नाही.
पनीरची पोत (texture) तपासा
पनीरची शुद्धता पाहण्यासाठी त्याचे टेक्स्चर पाहणे महत्त्वाचे आहे. यावरून तुम्ही शुद्ध आणि बनावट पनीरमधील फरक ओळखू शकता. शुद्ध पनीर हे मऊसूद असते, तर बनावट पनीरचे टेक्स्चर घट्ट असते. ते खाल्ल्यावर रबरासारखे ताणले जाते.
गुळगुळीतपणा आणि सुगंध
शुद्ध पनीरला दुधाळ सुगंध असतो. मात्र, कापल्यावर तो गुळगुळीत वाटतो. जर तुम्ही पनीर हातावर घासले तर ते पूर्णपणे चुरवले जाईल.
आयोडिन टिंचर टेस्ट
आयोडिन टिंचरचा वापर करून शुद्ध आणि बनावट पनीर ओळखता येते. पनीर पाण्यात उकळवा आणि काही वेळ थंड होऊ द्या. नंतर त्यावर आयोडिन टिंचरचे काही थेंब टाका. जर पाणी निळे किंवा काळे झाले तर ते पनीर बनावट आहे हे नक्की.