अनेकदा जेव्हा आपले वजन कमी होतं, तेव्हा आपण आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष न देता केवळ आपल्या व्यायामावर भर देतो. कारण आपल्याला वाटते की व्यायाम करून आपण आपले वजन वाढवू शकतो. परंतु तसं होत नाही. त्यासाठी आपल्याला उत्तम पद्धतीने आपल्या आहारात चांगल्या प्रकारच्या अन्नपदार्थांचा समावेश करावा लागतो. निरोगी शरीरासाठी योग्य वजन असणे आवश्यक आहे. वजन वाढवणे आणि योग्य पद्धतीने वजन वाढणे या दोन्ही पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. जर तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे असेल तर तुम्हाला काही प्रभावी उपाय करावे लागतील.
आपण रोज जे पदार्थ खात असतो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. वजन वाढल्यामुळे लोकं चिंतित असतात तसेच वजन फार कमी असल्यामुळे देखील लोकं काळजी करत असतात. तुम्ही बारीक असाल आणि तुम्हाला वजन वाढवायचे असेल काही खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास तुमचे वजन वाढू शकते. तर वजन वाढवण्यासाठी कोणकोणते पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते ते जाणून घेऊयात.
वजन वाढवण्यासाठीचा आहार
अंड
तुम्हाला जर का तुमचे वजन वाढवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रथिने, कॅल्शिअम आणि हेल्दी फॅट्स असणारा पदार्थ खाणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही अंडी खाणे फायदेशीर ठरते. अंडी खाल्ल्यामुळे शरीराचे वजन वाढण्यास मदत होते आणि नाश्त्याशिवाय दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणातही अंडी वेगवेगळ्या प्रकारे समाविष्ट करू शकता.
मासे
सॅल्मन माशांमध्ये प्रथिने आणि फॅटी ऍसिड असतात. जे तुम्हाला वजन वाढवण्यासाठी मदत करू शकतात. वजन वाढवणे आणि त्यासह रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी सॅल्मन माशाचे सेवन तुम्ही करू शकता. शिजवलेले मासे , फ्राय केलेले मासे आणि ग्रेव्ही तयार करून तुम्ही तुमच्या आहारामध्ये या माशांचे सेवन करू शकता.
हेही वाचा : मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात चुकूनही खाऊ नये ‘हे’ पदार्थ; वाढू शकते ब्लड शुगर
केळी
केळी खाल्ल्याने तुमचे वजन वाढवण्यास मदत करू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये केळ्यांचा समावेश करू शकता. तुम्ही केळ्यांचा शेक देखील तयार करून पिऊ शकता. यासाठी तुम्हाला २ केळ्यांचा शेक तयार करावा लागेल. तसेच त्यात ड्राय फ्रूट्सचा समावेश केल्यास आणखी फायदा होऊ शकतो. सकाळच्या वेळेस केळ्यांचा शेक प्यायल्यास पॉट पण भरते आणि वजन वाढण्यास मदत देखील होते.
ओट्सचा शेक
ओट्स शेक प्यायल्यामुळे देखील तुमचे वजन वाढवण्यास मदत होते. हा शेक तुम्ही सकाळी नाश्ता करताना पिऊ शकता. शेक तयार करण्यासाठी तुम्हाला एक कप ओट्स , २ केळी , दीड कप दूध, २ चमचे पीनट बटर आणि २ ते ३ चमचे मध असे साहित्य लागते. हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करावे. त्यानंतर हा शेक तुम्ही पिऊ शकता. यामुळे तुम्हाला तुमचे वजन वाढण्यास मदत मिळू शकते.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. वरीलपैकी कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )