What Are The Five Health Benefits Of Consuming Oats Daily : दररोजच्या धावपळीच्या जीवनात कोणाला नोकरीचं टेन्शन, कोणाला वजनाचं तर कोणाला अभ्यासाचं टेन्शन असते. यादरम्यान आपण चिडचिड कमी करून एखाद्या गोष्टीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकदा आपण सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्याला ओट्स खातो. तर ओट्स खाण्याची शिफारस तज्ज्ञांकडून सुद्धा केली जाते. पण,ओट्स हा फक्त नाश्ता नाही तर तुमचा फिटनेससाठी देखील खूप फायद्याचा आहे. तर दररोज ओट्स खाल्यावर तुमच्या शरीरात चांगले बदल होतात की वाईट हे सुद्धा आपण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे.
दररोज ओट्स खाल्ल्यावर शरीरात होतात पुढील बदल…
१. पचन सुधारते – ओट्समुळे तुमचे पोट हलके वाटते. ऑक्सफर्ड अकादमिकमध्ये प्रकाशित झालेल्या २०२० च्या संशोधन पत्रानुसार, ओट्समध्ये विरघळणारे फायबर भरपूर असतात; जे तुमची पचनसंस्था हळूवारपणे स्वच्छ करतात, बद्धकोष्ठता, पोटफुगी कमी करतात. एकूणच तुमचे आतडे अधिक स्थिर ठेवण्यात मदत करतात . कारण ओट्स शरीरातील पाणी शोषून जेलसारखे पोत तयार करू शकतात, जे शरीरातील मल सहजपणे काढून टाकण्यास मदत करतात.
२. बराच वेळ भूक न लागणे – आपल्यातील अनेकांना लंच टाइम आधीच १० किंवा ११ वाजता भूक लागण्यास सुरुवात होते. मग अशावेळी तुम्ही नाश्त्याला ओट्स खाण्यास सुरुवात करा. कारण – यामुळे तुम्हाला तासंतास अजिबात भूक लागत नाही. २०२१ मध्ये फूड्समध्ये प्रकाशित झाल्यावर रिव्युव्ह नुसार, ओट्समधील स्लो-रिलीज कार्ब्स अचानक भूक लागण्याच्या सवईला थांबवण्यास मदत करू शकतात. त्यामध्ये ओट्स खाताना फळे, काजू किंवा बिया त्यामध्ये टाकून खा. त्यामुळे तुम्हाला नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यास मदत करेल.
३. पोटाची चरबी कमी करण्यास मदत – पोटाची चरबी कमी करणे सगळ्यात कठीण काम आहे. पण, ओट्स तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला मदत करू शकतात. त्यामध्ये कॅलरीज कमी फायबर जास्त आणि तासंतास तुम्हाला भूक न लागण्यास मदत करू शकतात. यामुळे भूक-तहान आणि कॅलरीज नियंत्रित राहते. एकदा तुम्ही तुमची रक्तातील साखर स्थिर ठेवली की, ते कंबरेभोवती चरबीचा साठा देखील आपोआप कमी होऊ शकतो.
४. त्वचा चांगली राहते – एक वाटी ओट्स हायड्रेटिंग आणि दाहक-विरोधी अशा आतड्याच्या आरोग्यासाठी उत्तम असू शकतात , जो तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. दररोज ओट्स खाल्ल्याने चेहऱ्यावरील लालसरपणा, कोरडेपणा किंवा अनपेक्षित ब्रेकआउट्स कमी होण्यास मदत होते. तुमचे आतडे आणि त्वचा एकमेकांशी जोडलेले असल्याने, ओट्स खाल्ल्याने तुम्हाला नैसर्गिकरित्या चमकणारी त्वचा मिळू शकते, कारण तुमचे शरीर आतून विषारी पदार्थ काढून टाकण्यात मदत करतात.
५. ऊर्जा टिकून राहते – ओट्समध्ये असणाऱ्या फायबरमुळे, जेवणानंतरचा आळस दूर होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे नाश्त्याला व्हाईट ब्रेड किंवा प्रक्रिया केलेले धान्य यांसारखे पदार्थ खाल्ल्याने साखरेची पातळी वाढवण्याऐवजी, ओट्स तुम्हाला हळूहळू ऊर्जा सोडण्यास मदत करतात. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते, चिडचिड कमी होते आणि दिवसभर तुम्ही कामात लक्ष केंद्रित करू शकतात. म्हणून, दुपारच्याजेवल्यानंतर एक वाटी ओट्स खाल्ल्याने तुमच्या कामाच्या वेळापत्रकात मोठा फरक पडताना दिसू शकतो.