लहान खट्याळ मुलांना खाऊ घालणं हे कोणत्याही एका मोठ्या टास्कपेक्षा काही कमी नाही. तुमच्या मुलाचं जेवण त्याच्या मूडवर अवलंबून आहे का? अनेकदा लहान मुलं खाण्या-पिण्यासाठी कंटाळा करता किंवा मग वेगळी वेगळी कारणं देत असतात. त्यांचे नखरे पाहून मग पालक सुद्धा वैतागतात आणि मग त्यांना खाऊ घालण्यासाठी मागे मागे करणं सोडून देतात. पण प्रत्येक वेळी लहान मुलांनी असं वागणं हे त्यांच्या विकासासाठी योग्य नाही. काहीही करून लहान मुलांना खाऊ घालणं गरजेचं आहे. हे सारं करून तुम्ही वैतागले असाल तर तुमच्यासाठी काही खास ट्रिक्स घेऊन आलो आहोत. या ट्रिक्स एकदा नक्की वापरून पाहा.

मुलांसोबत फूड गेम खेळा

मुलांना खाऊ घालण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे त्यांच्यासोबत फूड गेम खेळणं. उदाहरणार्थ, कोण आधी रोटी किंवा पराठा खातो, फूड स्टोअर सेलर सारखे गेम्स खेळून ही लहान मुलं खेळता खेळता कधी तुमच्या ताटातलं अन्न संपवतील हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही.

क्रिएटीव्ह व्हा!

तुम्ही जितके जास्त क्रिएटिव्ह असाल, तितका फायदा मुलांना खायला देण्यात होतो. त्यांना आकर्षित करणारे आकार, रंग आणि चवी वापरून नवीन-नवीन डिश तुम्ही बनवू शकता. एखादा पदार्थ खायला मुलं अजिबातच तयार होत नाहीत, तेव्हा त्यामागचं नक्की कारण शोधायचा प्रयत्न करा. पदार्थ पुढे करताच सरळ नकार येत असेल, तर तो वेगळ्या पद्धतीनं बनवणं, तो सजवणं, त्याच्याऐवजी दुसरा पदार्थ देणं असे उपाय योजून बघा.जर तुम्हाला बाळाला पनीर सँडविच खायला द्यायचे असेल तर तुम्ही ते केचअपने सजवू शकता. आपण भाज्यांपासून क्रिएटिव्ह बनवून मुलांना अगदी सहज खाऊ घालवू शकता.

कार्टून किंवा रंगीत प्लेट्स

कार्टून किंवा मुलाच्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरने सजवलेले वेगवेगळे कप, प्लेट्स, लंच बॉक्स वापरून त्यात त्यांना पदार्थ देऊन खाऊ घालू शकता. या रंगीबेरंगी गोष्टींमध्ये मुलांना खाण्याचा आनंदही मिळेल.

मुलांना कोणतंही आमिष द्या

नेहमी ही ट्रिक्स वापरू नका. पण कधीकधी जेव्हा मूल जास्त अस्वस्थ होत असेल, तेव्हा जेवण केल्यानंतर मुलांना फिरायला घेऊन जाण्याचा किंवा आइस्क्रीम देण्याचा मोह देऊन खाऊ घालू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलांना एक गोष्ट सांगा

मुलांना जेवण करण्याच्या फायद्यांबद्दल कथा सांगत जा किंवा मुलांना सुपरहिरोच्या आवडीच्या पदार्थांसारखी कथा सांगत चला. विशेषतः जेवण देताना मुलांना गोष्ट सांगा, यामुळे मुलाचे संपूर्ण लक्ष कथेवर राहील आणि मुल अधिक अन्न खाऊन घेईल.