Weight Loss Tips in Marathi: प्रत्येक व्यक्तीसाठी निरोगी वजन असणे खूप आवश्यक आहे. निरोगी वजन वय, लिंग यावर अवलंबून असते. एका संशोधनात असे समोर आले आहे की ज्या व्यक्तीचे वजन नियंत्रणात आहे त्यांना स्ट्रोक किंवा हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका कमी असतो. कोरोना महामारीच्या काळात अनेकांचे वजन खूप वाढले होते आणि ते लोक आता वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, एखादी व्यक्ती १२ आठवड्यांत सुमारे ६ किलो वजन कमी करू शकते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि यामध्ये शारीरिक हालचाली देखील आवश्यक आहेत. वजन कमी करण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतींचा अवलंब करा.

Indian Diet and exercise Plan for Weight Loss How to start your weight loss journey as a beginner
वजन कमी करण्याची सुरुवात कशी करावी? काय खावे? कोणता व्यायाम करावा? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
Healthy Morning Routine
झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ६ गोष्टी; महिन्याभरात कमी होईल वजन, दिसाल स्लिम-ट्रिम!
Belly Fat Loss
पोटाची चरबी कमी करण्यासाठी ही पाच घरगुती पेये ठरू शकतात फायदेशीर; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…
diy weight loss mantra work weight loss formula 3 8 3 benefits explained No food 3 hours before bedtime sleep for 8 hours and no solid food 3 hours after waking
वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही; फॉलो करा एक्सपर्टचा ३-८-३ फॉर्म्युला; वजन झटपट होईल कमी

नाश्ता वगळू नका

तज्ज्ञांच्या मते, नाश्ता वजन कमी करण्यात मदत करत नाही. पण सकाळी हेल्दी ब्रेकफास्ट केल्याने तुम्हाला आवश्यक पोषक तत्व मिळतात, जे भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जर तुम्ही सकाळी नाश्ता केला नाही तर तुम्हाला पोषक तत्वे मिळत नाहीत आणि दिवसभर भूकही लागते.

नियमित खा

डॉक्टरांच्या मते, दिवसभर नियमित खाल्ल्याने कॅलरीज जलद बर्न होतात आणि भूक कमी होते. जर तुम्ही जास्त वेळ जेवलात नाहीत तर तुमची भूक वाढते आणि तुम्ही जास्त खाता. त्यामुळे तुमचे वजन वाढण्याची शक्यता आहे.

भरपूर फळे आणि भाज्या खा

फळे आणि भाज्यांमध्ये फॅट, कॅलरी आणि कर्बोदकांचे प्रमाण कमी असते. म्हणूनच ते पुरेसे प्रमाणात सेवन केले पाहिजे. राष्ट्रीय आरोग्य सेवेनुसार वजन कमी करण्यासाठी फळे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे.

नेहमी सक्रिय राहा

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही सक्रिय असणे आवश्यक आहे. जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करण्याची आणि प्रत्येक वेळी घाम गाळण्याची गरज नाही. यासाठी चालणे हा उत्तम मार्ग आहे. उदारणार्थ, अधिक चालणे, लिफ्टऐवजी पायऱ्या वापरणे, रात्री फिरणे.

( हे ही वाचा: दररोज २ सफरचंद खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झटक्यात कमी होईल? सेवनाची पद्धत एकदा जाणून घ्या)

भरपूर पाणी प्या

नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, अनेक वेळा लोकांना तहान लागते पण ते भूक समजून खायला सुरूवात करतात. अशा स्थितीत भूक लागली असेल तर आधी पाणी प्या आणि त्यानंतरही भूक लागल्यास आरोग्यदायी पदार्थ खा. त्यामुळे शरीराला जास्त कॅलरीज मिळू शकणार नाहीत.

लहान प्लेटमध्ये खा

राष्ट्रीय आरोग्य सेवेनुसार, जे लोक लहान प्लेटमध्ये अन्न खातात त्यांना कमी भूक लागते. आणि ते भूक कमी करण्यास मदत करतात. म्हणूनच अन्न नेहमी लहान ताटात घ्या आणि हळूहळू खा. पोट भरल्यावर खाणे बंद करा.

जंक फूड खाऊ नका

जंक फूडची इच्छा कोणालाही होऊ शकते. जर तुम्हाला त्या लालसा टाळायच्या असतील तर जंक फूड न घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. जर तुम्ही ते विकत घेतले नाही तर तुम्हाला ते खायची इच्छा सुदधा होणार नाही. वजन कमी करायचे असेल तर जंक फूड खाणे टाळावे.

दारू पिऊ नका

काही लोक अजूनही डाएटिंग करताना दारू पितात, जे चुकीचे आहे. कमी अन्न खाल्ल्याने जितक्या कमी कॅलरीज वापरता तितक्या जास्त कॅलरी तुम्ही मद्यपानातून घेतात. वजन कमी करायचे असेल तर दारू पिणे बंद करा. त्यामुळे शरीराला अतिरिक्त कॅलरीज मिळत नाहीत.

( हे ही वाचा: दिवसातून किती वेळा चहा प्यावा? तज्ज्ञ सांगतात “दिवसातून १..”)

कोणतेही अन्न टाळू नका

जर तुम्ही एखादे अन्न अजिबात न खाण्याचे ठरवले तर तुम्हाला ते खायची इच्छा अजून जास्त होते. म्हणूनच आहारात नेहमी कॅलरी, पोषक, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांची काळजी घ्या. वजन कमी करताना, तुम्ही अधूनमधून तुमच्या आवडत्या पदार्थांचे सेवन करू शकता, परंतु कॅलरींवर लक्ष ठेवून असे करा.

फायबरयुक्त अन्न खा

फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी कडधान्ये, सुका मेवा, फळे, भाज्या यांचे सेवन करावे. फायबर खरंच तुमचे पोट भरून ठेवते, त्यामुळे तुम्ही कमी खाता. फायबर जास्त खाणे टाळते आणि वजन कमी करण्यास मदत करते.