Food to Avoid During Periods: मासिक पाळी म्हणजेच पीरियड हे महिलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. मुलगी वयात आली की तिला मासिक पाळी सुरु होते. वयाच्या १२-१३ वर्षांपासून मुलींमध्ये शारीरिक व मानसिक बदलांसोबत दर महिन्याला मासिक पाळी सुरू होते. दर महिन्याचा त्या तारखेला चार ते पाच दिवस रक्तस्त्राव होतो. पाळी संदर्भात आहाराचं खूपच महत्त्व आहे, पण अनेक महिलांना हे माहितीच नसतं की आपण जे खातोय त्याने आपल्या पाळीवर परिणाम होतोय. आज आपण मासिक पाळी दरम्यान कोणते पदार्थ टाळावे हे जाणून घेऊया.

मासिकपाळी दरम्यान ‘या’ पदार्थांचे सेवन चुकूनही करू नका

१. थंड पदार्थ खाणे टाळा

मासिक पाळी दरम्यान थंड पदार्थांचे सेवन करणे टाळा. थंड पदार्थांमध्ये थंड पेय, आईस्क्रीम, दही, ताक यांचे सेवन टाळावे. तसेच आंबट फळे आणि फ्रीजमध्ये ठेवलेल्या गोष्टींचे सेवन टाळा, यामुळे तुम्हाला क्रॅम्प्स आणि वेदनापासून आराम मिळेल.

२. मसालेदार अन्न पदार्थाचे सेवन करणे टाळा

मासिकपाळी दरम्यान पचनक्रिया बिघडू लागते आणि पोट बिघडण्याची समस्या अधिक होते. या दरम्यान भरपूर अन्न, मांस, तेलकट अन्न, दूध आणि चहा टाळा. या सर्व पदार्थांचे सेवन केल्याने पचनक्रिया बिघडू लागते आणि पोटात समस्या निर्माण होऊ शकतात.

(हे ही वाचा : करोनाची लागण झालेल्या व्यक्तींचा रक्तदाब वाढू शकतो का? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर )

३. कॉफी पिणे टाळा

कॉफी पिणे कोणाला आवडत नाही, परंतु जेव्हा पीरियड्स असतात तेव्हा कॅफिनचे सेवन कमी करा. कॅफिनमुळे रक्तवाहिन्या संकुचित होऊ शकतात. या काळात चहा, कॉफी आणि दुधाचे सेवन कमी करा. दूध, चहा आणि कॉफीमुळे ॲसिडिटीची समस्या वाढू शकते. 

४. गोड पदार्थ टाळा

जास्त प्रमाणात मिठाई खाणे टाळावे. गोड पदार्थ, कॅफिन आणि अल्कोहोल हे शरीरात रसायने तयार करतात, ज्यामुळे वेदना रिसेप्टर्स वाढतात.

५. खारट पदार्थ टाळा 

पाळीच्या काळात पोटात किंवा कंबरेत क्रॅम्प येणे हे सगळ्यात सामान्य लक्षण आहे. स्नायूंमध्ये एकसारखे क्रॅम्प येत असतील तर आपण हैराण होऊन जातो. त्यात मीठाचे पदार्थ खाल्ल्यास हे क्रॅम्प वाढण्याची शक्यता असते. म्हणून खारट पदार्थ खाणे टाळा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित असून ‘लोकसत्ता’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)