How To Grow Flowers on Plants: अनेक लोकांना बागकाम करायला आवडते. बाग छोटीशी असली किंवा अगदी बाल्कनीतल्या कुंड्या असतील तरी त्यात जास्वंद, गुलाब, मोगरा, अशी अनेक फुलांची झाडं असतातच. टेरेस गार्डन किंवा बाल्कनीमध्ये या फुलांची रोपं लावायला आणि बागेचे सौंदर्य वाढवायला अनेकांना आवडते. आपल्या बाल्कनीमध्ये विविध प्रकारची रोपं लावून त्याची शोभा वाढविण्यासाठी आपण रोज काही ना काही उपाय करीत असतो. अनेक लोक बागेत फुलांची रोपं लावतात, पण त्या रोपाला पाहिजे तशी फुलं येत नाहीत. अनेक लोक तक्रार करतात की, त्यांच्या लागवड केलेल्या रोपांना फुले येत नाहीत. विशेषत: ज्या झाडांना चांगली फुले येतात ती फुलणे थांबवतात.
झाडे निरोगी राहण्यासाठी आणि फुले येण्यासाठी त्यांना भरपूर मातीची आवश्यकता असते. जमिनीतील पोषक द्रव्ये वाढवण्यासाठी चांगल्या दर्जाचे खत वापरणे आवश्यक असतेच असे नाही. तुम्हाला तुमची बाग फुलांनी भरलेली आणि सुंदर ठेवायची असेल, तर तुम्ही घरच्या घरी खत तयार करू शकता. यासाठी खर्चदेखील येणार नाही, कारण तुमच्या स्वयंपाकघरातच एक जादुई उपाय लपलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया, आपण या रोपांसाठी कोणते घरगुती खत तुम्ही वापरू शकता.
चहा भारतीयांचे आवडते पेय आहे. देशातील बहुतेक घरांत चहाच्या सेवनाने दिवसाची सुरुवात होत असते. बऱ्याचदा चहाचे सेवन केल्यानंतर चहाची पावडर आपण फेकून देतो. मात्र, जी पावडर आपण फेकून देतो, त्या चहाच्या पावडरचे तुमच्या रोपांसाठी फायदे वाचून तुम्हीही थक्क व्हाल. तुम्ही रोज जो चहा बनवता त्याची उरलेली चहा पावडर तीच गाळून झालेली, काळसर, ओलसर चहा पावडर तीच आहे, तुमच्या फुलझाडांची सुपरफूड!
या पावडरमध्ये नैसर्गिकरित्या पोटॅशियम भरपूर असतं, जे फुलझाडांच्या बहरासाठी जबरदस्त काम करतं. खतं न वापरता ही पावडर कुंडीत मिसळा आणि बघा फुलांची धमाल. काही दिवसांतच तुमची बाग फुलांनी बहरेल. फक्त लक्षात ठेवा, जेव्हा झाडाला कळ्या यायला सुरुवात होते, तेव्हा पाणी अगदी मोजून घाला; कारण जास्त पाण्याने झाडाची पोषक तत्त्वं वाहून जातात. माती थोडीफार सैल करा, हवा तितका ओलावा ठेवा आणि ही चहाची गोष्ट झाडाला अर्पण करा. काही दिवसांतच तुम्हाला तुमच्या बाल्कनीत बहरलेली रंगीबेरंगी फुलं दिसू लागतील. हा झिरो बजेट जुगाड तुम्ही आजच वापरून पाहा.