स्मार्टफोन बनवणाऱ्या Gionee कंपनीने जवळपास वर्षभरानंतर भारतीय स्मार्टफोन बाजारात पुनरागमन केलं आहे. कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन Gionee Max लाँच केला आहे. Gionee Max स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर आणि ड्युअल रिअर कॅमेरा आहे. 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी असलेला Gionee Max हा एक एन्ट्री लेवल स्मार्टफोन आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Gionee Max ची भारतात किंमत :- 
भारतीय बाजारात Gionee Max केवळ 2 जीबी रॅम व 32 जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमअध्ये उपलब्ध असेल. 5,999 रुपये इतकी कंपनीने या फोनची किंमत ठेवली आहे. ब्लॅक, रेड आणि रॉयल ब्लू असे तीन रंगांचे पर्याय या फोनसाठी आहेत. 31 ऑगस्ट रोजी ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर या फोनसाठी पहिल्यांदा सेल आयोजित करण्यात आला आहे.

आणखी वाचा- फक्त 7,499 रुपयांच्या किंमतीत दमदार फीचर्स, ‘स्वस्त’ स्मार्टफोनवर शानदार ऑफर्स

Gionee Max स्पेसिफिकेशन्स :-
ड्युअल सिमकार्डचा पर्याय असलेल्या या फोनमध्ये अँड्रॉइड 10 चा सपोर्ट आहे. 6.1 इंचाचा एचडी प्लस असून डिस्प्लेवर 2.5डी कर्व्ह्ड ग्लास प्रोटेक्शन आहे. फोनमध्ये Unisoc 9863A ऑक्टाकोर  प्रोसेसर असून 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यातील 13 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असून दुसरा डेफ्थ सेन्सर आहे. तर, सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही आहे. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ 4.2, जीपीएस/ए-जीपीएस आणि 3.5एमएम हेडफोन जॅक आहे. 185 ग्रॅम इतकं या फोनचं वजन आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gionee returns to india now launches gionee max smartphone available on flipkart at rs 5999 check details sas
First published on: 26-08-2020 at 10:46 IST