भारतात Gmail आणि Google Suite च्या युजर्सना समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत अनेकांनी ट्विटरवर तक्रार केली आहे. याची दखल जीमेलने घेतली असून समस्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युजर्सना बुधवारी संध्याकाळी जवळपास एक तास जीमेल डाउन झाल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला. जीमेलच्या डेस्कटॉप व्हर्जनमध्ये ही समस्या येत असून मोबाइल अ‍ॅप व्यवस्थित सुरू आहे. युजर्सकडून तक्रारी मिळाल्यानंतर जीमेलने ट्विटरद्वारे समस्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, लवकरच सेवा पूर्ववत होईल अशी माहिती दिली आहे. पण सेवा डाउन होण्यामागे नेमकं काय कारण आहे याबाबत अद्याप कंपनीने माहिती दिलेली नाही.

दरम्यान, जीमेल डाउनचा फटका भारतीय युजर्ससह जगभरातील अन्य युजर्सनाही बसलाय का हे अजून समजलेलं नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gmail down for users in india google is working on a fix sas
First published on: 02-07-2020 at 09:47 IST