लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना भोपळा आवडत नाही. पण काही लोकं अशी असतात की ते आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी भोपळ्याच्या बियांना आपल्या आहारातील एक महत्वाचा भाग बनवतात. भोपळ्याच्या बियांचे गुणधर्म आणि आरोग्यासाठी असणारे त्यांचे फायदे जाणून घेतल्यास तुम्ही सुद्धा याचा तुमच्या आहारात समावेश कराल. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर जीवनसत्व, मॅग्नेशिअम , लोह,प्रथिने आणि आवश्यक फॅटी ऍसिड असतात. आज आपण भोपळ्याच्या बियांचे सेवन कसे करावे आणि त्याचा आरोग्यासाठी कोणकोणते फायदे आहेत ते पाहणार आहोत.

भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे

भोपळ्याच्या बिया खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या भाजून खाणे. भोपळ्याच्या बिया भाजून घेतल्यामुळे त्याची चव अधिक चांगली होती. या बिया बारीक करून त्याचे लोणीदेखील तयार करता येते. याबाबतचे वृत्त ndtv ने दिले आहे.

हेही वाचा : Raksha Bandhan 2023: बहिणीसाठी घ्या एकापेक्षा एक बजेट फ्रेंडली गिफ्ट्स, एकदा पाहाच

हृदय चांगले राहते

भोपळ्याच्या बियांमुळे हृदय निरोगी राहू शकतो. या बियांममध्ये फायबर, हेल्दी फॅट्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे कोलेस्टेरॉलसारख्या समस्या दूर ठेवण्यासाठी मदत करतात. या बियांमध्ये आढळणारे मॅग्नेशियम रक्तदाब पातळी नियमित करण्यासाठी फायदेशीर ठरते.

वजन कमी होऊ शकते

भोपळ्याच्या बिया वजन कमी करण्यासाठी उत्तम नाश्ता आहे. या बिया खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. जे अतिरिक्त अन्नाचे सेवन कमी करण्यास मदत करते. तसेच सारखे सारखे खाण्याची इच्छा होत नाही.

प्रतिकारशक्ती वाढू शकते

तुमच्या शारतीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बियांचे सेवन करू शकता. या बियांमधील अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.

हेही वाचा : Health Tips: काय सांगता! व्यायामाशिवाय वजन कमी करता येते? ‘हे’ सोपे उपाय करून बघा

केसांची वाढ होते

व्हिटॅमिन सी साठी भोपळ्याच्या बिया चांगल्या असतात. यांचे सेवन केल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते. भोपळ्याच्या बियांचे तेलही केसांना लावता येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)