Uric Acid and Night Dinner: शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्याने सांधेदुखी, सूज आणि सांधेदुखीचा धोका वाढतो. युरिक अॅसिडमुळे मधुमेह, रक्तदाब आणि थायरॉईडचा धोकाही वाढतो. शरीरात ३.५ ते ७.२ मिलीग्राम प्रति डेसीलिटर यूरिक अॅसिड असावे. यापेक्षा जास्त प्रमाणात युरिक अॅसिड असेल तर ते स्फटिकांच्या(crystals) स्वरूपात सांध्यांमध्ये जमा होते. त्यामुळे सांधेदुखीची समस्याही सुरू होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आहाराद्वारे युरिक अॅसिडला बऱ्याच अंशी नियंत्रित करता येते. आहारात प्युरिनयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास शरीरातील युरिक अॅसिड वाढते. युरिक अॅसिड हे एक प्रकारचे विष आहे जे अन्न पचल्यानंतर शरीरात तयार होते. मूत्रपिंड ही विषारी द्रव्ये शरीराबाहेर टाकतात, परंतु जेव्हा ही विषारी द्रव्ये सांध्यांमध्ये जमा होऊ लागतात तेव्हा मूत्रपिंड त्यांना काढून टाकण्यास असमर्थ असतात. शरीरातील युरिक अॅसिड कमी करायचे असेल तर रात्री या गोष्टींचे सेवन टाळा. चला जाणून घेऊया रात्री कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये.

( हे ही वाचा: हिवाळ्यात कधी आणि किती पाणी प्यावे? तुम्हाला पाणी पिण्याची योग्य पद्धत माहित आहे का?)

रात्रीच्या जेवणामध्ये मांस खाऊ नका

उच्च यूरिक ऍसिडचा त्रास असलेल्या रुग्णांनी रात्रीच्या जेवणात मांस खाणे टाळावे. रात्रीच्या जेवणात मटण, रेड मीट, ऑर्गन मीट आणि सी फूड यासारखे खाद्यपदार्थ टाळावेत. वेरिटास हेल्थच्या आर्थराइटिस हेल्थ या आरोग्यविषयक वेबसाइटमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, अशा प्रकारचे अन्न खाल्ल्याने यूरिक अॅसिड वेगाने वाढते.

रात्री दारू पिणे टाळा

अल्कोहोल पिण्याने देखील यूरिक ऍसिड वाढते, मेडिकल न्यूज टुडेच्या मते, युरिक ऍसिडची समस्या असलेल्या लोकांनी रात्रीच्या वेळी दारू पिणे टाळावे. अल्कोहोलमध्ये प्युरीन नावाचा पदार्थ जास्त प्रमाणात असल्याने शरीरातील यूरिक अॅसिडची पातळी वाढवण्याचे काम करते.

( हे ही वाचा: १० वर्षांपूर्वीच दिसू लागतात हृदयविकाराची ‘ही’ गंभीर लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखावे)

रात्री डाळ खाणे टाळा

कडधान्यांचे अनेक प्रकार आहेत, काही डाळींमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला युरिक अॅसिडचा त्रास होत असेल तर रात्रीच्या जेवणात डाळ खाणे टाळावे. डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे शरीरात उर्जेचे उत्पादन जास्त होते. आर्थरायटिस हेल्थच्या मते, झोपेच्या वेळी शरीराचे तापमान थोडे कमी होते आणि तापमानातील ही घसरण सांध्यामध्ये यूरिक ऍसिड क्रिस्टल्स तयार करण्यास चालना देऊ शकते. त्यामुळे रात्रीच्या वेळी डाळ खाणे टाळावे.

रात्री गोड पदार्थ खाऊ नका

मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी सर्वसाधारणपणे गोड पदार्थांचे सेवन टाळावे, परंतु संधिवात किंवा संधिरोगाचा त्रास जाणवत असेल तर रात्रीच्या वेळी गोड पेये किंवा पदार्थांचे सेवन टाळावे. गोड गोष्टी तुम्हाला अडचणीत आणू शकतात. यामुळे सांधेदुखीची समस्या वाढू शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gout attacks strike mostly at night do not consume these things arthritis may increase gps
First published on: 13-11-2022 at 11:25 IST