Hacks to Remove Musty Smell from mattress : पावासाळ्यात जवळपास प्रत्येक घरात काही ना काही समस्या जाणवतात. या जर घरात ओलसरणा असेल तर या समस्या अधिकच असतात. कुठे कपडे लवकर सुकत नाहीत, कुठे ओलसरपणामुळे भिंती खराब होतात, कुठे घराचं छत गळतं तर कुठे पावसामुळे लाद्यांमधून ओल मारते. यात आणखी एक मोठी समस्या म्हणजे पावसाळ्यात अंथरुणातून येणारा कुबट, घाणेरडा, उग्र वास, जो इतका भयंकर असतो की, घरात कितीही स्वच्छता ठेवा तरी येत राहतो. पावसाळ्यात ओलसरपणामुळे अंथरुण किंवा गाद्यांमधील कापूस भिजून दुर्गंधी येऊ लागते. असे दुर्गंधीयुक्त अंथरुण घेऊन आरामदायी झोप लागत नाही, अशावेळी या समस्येपासून सुटका करुन घेण्यासाठी तुम्ही खालील फक्त ५ भन्नाट ट्रिक्स फॉलो करु शकता.

या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही पावसाळ्यात अंथरुणातून येणारा कुबट, उग्र दुर्गंधी घालवू शकता आणि आरामदायी झोप घेऊ शकता.

अंथरुणापर्यंत ओलसरपणा कसा पोहोचतो?

जर तुमच्या घरातील भिंतीवर किंवा मजल्यावर ओलसरपणा असेल, तर गादीला वास येणे खूप सामान्य आहे. तसेच जर घरात वेंटिलेशनसाठी जागा नसेल तरीही ही समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही याचा त्रास होत असेल, यावेळी खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा.

१) व्हिनेगरचा करा वापरा

अनेकजण स्वयंपाक घरात आणि साफसफाईसाठी व्हिनेगरचा वापर करतात. तुम्ही गादीतील ओलसरपणा दूर करण्यासाठीही व्हिनेगर वापरु शकता, कारम तो एक चांगला क्लिनिंग एजेंट मानला जातो. यासाठी एका स्प्रे बाटलीत व्हिनेगर भरून गादीच्या दोन्ही बाजूंवर नीट शिंपडा.

२) अंथरुण हवेत सुकवा

ओलसरपणामुळे अंथरुणातून कुबट वास येत असेल तर ही अंथरुण दिवसातील काही तास उघड्यावर सुकत ठेवा. जर ऊन असेल तर अंथरुण थोडा वेळ बाहेर ऊन्हात ठेवा. यामुळे अंथरुणातील कुबूट वास कमी होईल, जर काही दिवस तुम्ही हा उपाय केल्यास अंथरुणातील कुबूट वासही कमी होईल.

३) अंथरुणावर व्हॅक्यूमचा वापर करा

गादी किंवा गोधड्यांवर ओलसरपणामुळे लवकर धुळीचा थर जमा होतो, त्यामुळे त्यातून अधिकच उग्र वास येऊ लागतो. यावेळी तुम्ही व्हॅक्यूम मशीनचा वापर करु शकता.

जर व्हॅक्यूम मशीन नसेल तर तुम्ही धूळ काढण्यासाठी पारंपारिक पद्धतीचा वापर करु शकता. यासाठी प्रथम गादीला एका दोरीवर ठेवा आणि आता पातळ काठीने गादीला धोपटा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४) बेकिंग सोड्याचा करा वापर

व्हिनेगर फवारल्यानंतर गादीवर कोरडा बेकिंग सोडा शिंपडा. १० ते ३५ तास असेच ठेवा, यानंतर गादी नीट झटका. व्हॅक्यूम मशीनने हे काम खूप सोपे होते. मात्र हा उपाय करुनही तुम्ही गादीतील उग्र वास कमी करु शकता.