केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केस गळायला वेळ लागत नाही. केसांचे सौंदर्य जितके त्याच्या अंतर्गत पोषणावर अवलंबून असते तितकीच त्याची बाहेरूनही काळजी घेतली पाहिजे. आपण सगळेच केस धुतो आणि ऐकल्यावर वाटतं की त्यात काय मोठं काम आहे. पण, केस धुण्याचा एक योग्य मार्ग देखील आहे. केस नीट धुतले नाहीत तर केस खराब होणे, कोरडे होणे, कोंडा होणे, केस गळणे आणि स्प्लिट एंड्स अशा अडचणी होऊ शकतात. म्हणूनच तुम्हाला हे देखील माहित असले पाहिजे की केस धुताना कोणत्या २ सामान्य चुका आहेत ज्या तुम्ही करू नयेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केस धुताना होणाऱ्या २ चुका

१. केस धुताना होणारी सर्वात सामान्य आणि मोठी चूक म्हणजे केसांना योग्य प्रकारे शॅम्पू न लावणे. बहुतेक लोक केस धुताना सर्व केसांवर शॅम्पू लावतात, खरतर शॅम्पू केसांच्या मुळांनाच लावावा. केसांची मुळे तेलकट असतात परंतु केसांची टोके कोरडी असतात, त्यामुळे केसांवर शॅम्पू घासल्याने ते अधिक कोरडे होतात. त्यामुळे शॅम्पू फक्त केसांच्या मुळांना लावावा, जेणेकरून केसांवर पाणी टाकताच शॅम्पूची पुरेशी मात्रा पाण्यासह उर्वरित भागात पोहोचेल.

(हे ही वाचा: थंड किंवा गरम? कोणत्या प्रकारच्या पाण्याने केस धुवावे?)

२. केसांना चुकीच्या पद्धतीने कंडिशनर लावणे ही देखील एक समस्या आहे. कंडिशनर लावताना अनेकजण केसांच्या मुळांमध्ये म्हणजेच टाळूवरही कंडिशनर लावतात. कंडिशनर फक्त केसांच्या लांबीवर लावावे, टाळूला लागू नये. कंडिशनर टाळूला तेलकट बनवते, तसेच ते टाळूचे रॉम छिद्र बंद करू शकते, ज्यामुळे केस खराब होण्याची शक्यता असते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hair falls out due to these 2 mistakes learn the proper method of washing ttg
First published on: 24-03-2022 at 12:00 IST