Happy Diwali SMS for Friends & Family : दिवाळी हा प्रकाश, आनंद आणि एकोप्याचा सण आहे. या सणात प्रत्येक घरातून फराळाचा सुगंध दरवळतो, अंगणात दिव्यांची आरास केली जाते, दाराला तोरण बांधले जाते आणि आकाशकंदील लावला जातो. दिवाळीत सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतं. अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करताना, लोक आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देतात आणि नवीन उमेद, आशा व सकारात्मकतेने नव्या वर्षाची सुरुवात करतात.

वसुबारस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा व भाऊबीज हा पाच दिवसांचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या प्रत्येक दिवशी खास परंपरा आणि भावनांचा संगम असतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धन, समृद्धी व सुखाची प्रार्थना केली जाते;तर भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम वाढवणारा दिवस असतो. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि त्याला आरोग्य, सुख, समृद्धी अन् ऐश्वर्य मिळो, अशी प्रार्थना करते. या सर्व दिवसांना एकत्रितपणे दिवाळीचा खरा अर्थ — आनंद, कृतज्ञता व स्नेह अधिक वाढवतात. आप्तस्वकीयांना, प्रियजनांना शुभेच्छा दिल्या जातात. आज आपण काही हटके शुभेच्छा संदेश जाणून घेणार आहोत. हे दिवाळीचे शुभेच्छा संदेश तुम्ही व्हॉट्सअप्स, मेसेज, स्टेटस, फेसबुकद्वारे तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणी तसेच नातेवाइकांना पाठवू शकता.

यंदा दिवाळी कधी आहे?

  • १८ ऑक्टोबर २०२५ – धनत्रयोदशी
  • २० ऑक्टोबर २०२५ – नरक चतुर्दशी
  • २१ ऑक्टोबर २०२५ – लक्ष्मीपूजन
  • २२ ऑक्टोबर २०२५ – बलिप्रतिपदा/ दिवाळी पाडवा
  • २३ ऑक्टोबर २०२५ – भाऊबीज

दिवाळीच्या शुभेच्छा

गोवर्धन पूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंद, उत्साह अन् हर्ष उल्हासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला,
दिवाळीच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!

Best Diwali 2025 Wishes & Messages in Marathi
दिवाळी २०२५ शुभेच्छा संदेश ग्रीटिंग्स| लक्ष्मी पूजन कोट्स आणि शुभेच्छा

घेऊनी सोनेरी प्रकाश दिव्यांचा,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!

जुने सारे विसरून जावे
सुख-दु:ख वाटून घ्यावे
पर्यावरणाशी एकरूप व्हावे
सुख-समृद्धीचे बीज पेरावे
अवतरला उत्सव प्रकाशाचा
तेजस्वी सण आला दिवाळीचा
दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या सोनेरी पावलांनी
तुमच्या घरी सुख-समृद्धी येऊ दे
नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Best Diwali 2025 Wishes & Messages in Marathi
दिवाळी २०२५ शुभेच्छा संदेश ग्रीटिंग्स| लक्ष्मी पूजन कोट्स आणि शुभेच्छा

चंद्राचा कंदील घरावरी
चांदण्यांचे तोरण दारावरी…
क्षितिजाचे रंग रांगोळीवरी
दिवाळीचे स्वागत घरोघरी..!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभ दीपावली…

Best Diwali 2025 Wishes & Messages in Marathi
दिवाळी २०२५ शुभेच्छा संदेश ग्रीटिंग्स| लक्ष्मी पूजन कोट्स आणि शुभेच्छा

सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली
तिखट-गोड फराळाची मेजवानी सजली
आनंदाची उधळण करीत आली दिवाळी
दिवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा!

मराठमोळी संस्कृती आपली,
मराठमोळी माती आपली,
मराठमोळा आपला बाणा,
मराठमोळा उत्सव आपला
अशीच चिरंतन राहो आपली ही प्रेमाची नाती,
शुभ दीपावली…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या जीवनातल्या अंधाराचा नाश होवो,
कर्माची वात, भक्तीचं तेल
आत्म जाणिवेची ज्योत लावून
आपल्या ज्ञानाचा प्रकाश सदैव तेवत राहो…
हीच ईश्वरचरणी सदिच्छा!!!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

बालपणाच्या गोड आठवणींनी भरलेला उत्सव,
फटाक्यांनी भरलेले आकाश
मिठायांनी भरलेले तोंड,
दिव्यांनी भरलेले घर,
आणि हृदयात आनंद…
दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा…!!!

Best Diwali 2025 Wishes & Messages in Marathi
दिवाळी २०२५ शुभेच्छा संदेश ग्रीटिंग्स| लक्ष्मी पूजन कोट्स आणि शुभेच्छा

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
दिवाळीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!!!

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही दिशा
घेऊनी येवो नवी उमेद, नवी आशा
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांची पुष्पे घेऊनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेऊनी, दीपावली ही आली..
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!

Best Diwali 2025 Wishes & Messages in Marathi
दिवाळी २०२५ शुभेच्छा संदेश ग्रीटिंग्स| लक्ष्मी पूजन कोट्स आणि शुभेच्छा

फराळाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
एकच मागणे दिवाळी सणाला
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

फटाके, कंदील अन्
पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही
लज्जत न्यारी…
नव्या नवलाईची दिवाळी येता,
आनंदली दुनिया सारी…!
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ,
गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी,
हीच देवाचरणी प्रार्थना,
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

दिवाळीत खाऊया खूप साऱ्या मिठाया,
फराळासाठी मित्रांना बोलवूया,
शेजाऱ्यांच्या दरवाजांवरही लावूया पणत्या,
प्रियजनांना आनंदाने मिठी मारू या,
लक्ष्मीची आरती करू या,
सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

दिवाळीची शान तेव्हाच आहे
जेव्हा गरिबांची मुलंही लावतील फुलबाज्या,
त्यांच्याकडेही असेल मिठाई,
जोपर्यंत दूर होणार नाही हा भेदभाव
तोपर्यंत कशी होईल दिवाळीची खरी रोषणाई…
सर्वांना करून आनंदी
मगच साजरी करा दिवाळी.

दीपावलीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा

जीवनाचे रूप आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी खरोखरच अलौकिक असून,ती तुमच्यासाठी सुख, समाधान आणि वैभवाच्या दीपमाळांनी जीवन लखलखीत करणारी असावी… दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दीपावलीच्या आजपासून ते भाऊबीजेपर्यंतच्या साजऱ्या होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!. हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो याच मनोकामना…! दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

लक्ष्मीपूजन शुभेच्छा

धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
गोडधोड फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सहपरिवारास सोनेरी शुभेच्छा!
शुभ दिवाळी!

लक्ष्मीचा सहवास नित्य असू दे,
चांगल्या मार्गाने समृद्धी मिळू दे,
लक्ष्मीपूजनाचे सौख्य नेहमी लाभू दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळीत दारी दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घरात सुख-समृद्धी नांदू दे.
सर्वांची सारी स्वप्नं साकार व्हावीत,
ही दिवाळी आपल्यासाठी सुवर्ण ठरावी.
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

घरात लक्ष्मीचा वास
अंगणी दिव्यांची आरास
वाढवी मनाचा उल्हास
दिवाळी सण आहे खास
शुभ दीपावली

लक्ष्मी आली सोनपावलांनी,
उधळण झाली सौख्याची,
धन-धान्यांच्या राशी भरल्या,
घरी नांदू दे सुख-समृद्धी!

लोकसत्ता डॉट कॉमकडून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा!