Maha Shivratri 2022 Wishes in Marathi: देशभरात दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. यावेळी १ मार्च म्हणजेच मंगळवारी महाशिवरात्री उत्सव साजरा केला जाणार आहे. सकाळपासूनच शिवमंदिरांमध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. या दिवशी आवर्जून एकमेकांना शुभेच्छा मेसेज पाठवतात. तुमच्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा, संदेश.

१. ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
जय शिव शंकर..
महाशिवरात्री हार्दिक शुभेच्छा!

२. हर हर महादेव !
जय जय शिवशंकर ।
महाशिवरात्रीच्या सर्वाना
शिवमय शुभेच्छा!!

(हे ही वाचा: Maha Shivratri 2022: पूजा करताना ‘या’ गोष्टी आवर्जून ठेवा लक्षात; अन्यथा भगवान शंकर होऊ शकतात नाराज)

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सोने-चांदी झाले महाग! जाणून घ्या आजचा दर)

३. शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात
नेहमी आनंदच आनंद देवो…
ओम नमः शिवाय

४.जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे
क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे!
जय महाकाल हर हर महादेव

(हे ही वाचा: Maha Shivratri 2022: महाशिवरात्रीला बनवा मसालेदार उपवासाच्या पिठाची टिक्की! जाणून घ्या रेसिपी)

५. ज्याने घेतलं मनापासून शंकराचं
नाव त्यावर शंकराने केला
सुखांचा वर्षाव
हर हर महादेव!!

६. ॐ नमः शिवाय…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
हर हर महादेव !

७. कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..
तुज विण शंभु मज कोण तारी…
हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

८. दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

९. हर हर महादेव, बोलतो आहे
प्राटक जन. होईल मनोकामना पूर्ण,
आनी मोली तुहळा
सुख समृद्धी आनी धन.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

१०. बेलाचे पान वाहतो महादेवाला,
करतो वंदन दैवताला ,
सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला
महाशिवराञी च्या शुभेच्छा.
ॐ नमः शिवाय!

११. भगवान शंकराची महिमा आहे अपरंपार
शिव करतात सर्वांचा उद्धार
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहो
भगवान शंकर तुमचे आयुष्य आनंदाने भरो.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(मेसेज क्रेडिट: सोशल मीडिया)