खराब लाइफस्टाइलमुळे रात्री उशिरा जेवणे, जास्त खाणे आणि जेवल्यानंतर लगेच झोपणे या सवयीमुळे तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकतात. योग्य खाणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच खाण्याची योग्य पद्धत देखील महत्त्वाची आहे.

जर तुम्हालाही जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असेल, तर हेच तुमच्या अनेक आजारांचे कारण आहे. कारण जर तुम्ही योग्य आहार घेत असाल परंतु आहार घेण्याची वेळ किंवा जेवल्यानंतर करायची क्रिया योग्य नसेल तर हे जेवण तुमचे चांगल्यापेक्षा जास्त नुकसान करेल. त्यामुळे त्यात सुधारणा करण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. दिवसभरात जेवल्यानंतर झोप येत असेल तर ही सवय बदला. चला तर मग जाणून घेऊया की जेवल्याबरोबर झोपायची सवय असेल तर कोणते आजार तुम्हाला घेरतात.

Mumbai, accident death, uncle, negligence, Nephew
मुंबई : पुतण्याचा निष्काळजीपणा काकाच्या जीवावर बेतला
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
pune crime news, son beats mother pune marathi news,
मुलाकडून आईला बेदम मारहाण… घर नावावर करून देत नसल्याने डोक्यात मारली खूर्ची
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

(हे ही वाचा: मधुमेह असलेल्यांनी गोड खाऊ नये? सत्य काय आहे ते जाणून घ्या)

रक्तातील साखरेची पातळी

जेवणानंतर शरीरातील साखरेची पातळी वाढते. जेवल्याबरोबर झोपायची सवय असेल तर साखर शरीरात वापरली जात नाही आणि जास्त साखर रक्तात विरघळू लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्रीचे जेवण केल्यानंतर लगेच झोपल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढू शकते. त्यामुळे वजन तर वाढतेच पण अनेक आजारही होतात.

(हे ही वाचा: ‘या’ ५ गोष्टी टाळाच! नाहीतर होऊ शकतो किडनीवर गंभीर परिणाम)

अपचन

जेवल्यानंतर लगेच झोपल्याने शरीरातील बहुतेक अवयव स्थिर होतात आणि पचनासह शरीराची अनेक कार्ये मंदावतात. यामुळे तुमचे अन्न नीट पचत नाही. यामुळे जे लोक जेवल्यानंतर झोपी जातात, त्यांना उठल्यानंतरही पोट भरलेले वाटते. त्यामुळे बद्धकोष्ठता, पोट फुगणे, अपचन अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.

(हे ही वाचा: Astrology 2022: राशीनुसार ‘या’ सवयी बदलल्या नाहीतर होईल नुकसान)

लठ्ठपणा

रात्री उशिरा जेवल्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी बिघडते. याशिवाय जेवल्यावर लगेच झोप लागल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म क्रियेवर परिणाम होतो आणि लठ्ठपणा वेगाने वाढू लागतो. याशिवाय त्याचा झोप आणि आरोग्य या दोन्हींवर परिणाम होतो. जेवल्यानंतर किमान २ तास झोपू नका.