scorecardresearch

‘या’ तेलामध्ये आहे जादू; अनेक आजारांवर ठरतोय रामबाण उपाय! जाणून घ्या फायदे

मसाल्यांमध्ये वापरण्यात येणारा एक पदार्थ उपयोगी आहे. मसाल्यांमध्ये वापरला जाणारा हा असा पदार्थ आहे ज्यामुळे आरोग्याला भरपूर फायदे आहेत.

‘या’ तेलामध्ये आहे जादू; अनेक आजारांवर ठरतोय रामबाण उपाय! जाणून घ्या फायदे
लवंग तेल फायदेशीर आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

लवंग हा एक फायदेशीर मसाल्याचा पदार्थ आहे. आयुर्वेदात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हे आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते. लवंगाच्या तेलात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे दाह कमी करण्यास मदत करतात. वेदनादायक भागावर त्याचा वापर केल्याने थंडपणा आणि आराम मिळतो. लवंग तेलामध्ये अँटीव्हायरल, अँटीमाइक्रोबायल, अँटीफंगल आणि एन्टीसेप्टिक गुणधर्म असतात, म्हणून ते घरगुती उपाय म्हणून वापरले जातात. लवंगाचे तेल आरोग्य आणि त्वचेशी संबंधित समस्या काढून टाकते, तसेच ते सौंदर्य वाढवण्यासाठी वापरले जाते. या फायदेशीर तेलाचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत जाणून घ्या सविस्तर.

 दातदुखीपासून सुटका

लवंगाचे तेल दात निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषतः हे तेल दातदुखी कमी करण्यासाठी प्रभावी आहे. शिवाय, यामुळे तोंडाची दुर्गंधीही कमी होऊ शकते. श्वासाची दुर्गंधी येत असेल तर लवंगाच्या तेलाच्या गुळण्या करा.

कर्करोगापासून संरक्षण करते

लवंगाचे तेल कर्करोगासारख्या गंभीर आजारांना रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकते. या तेलात युजेनॉल नावाचा एक विशेष घटक आढळतो, जो कर्करोगापासून बचाव करू शकतो. तुम्हाला कर्करोग होण्याचा धोका असल्यास हे तेल वापरा.

(आणखी वाचा : रात्री एक ग्लास गरम दूध पिणं म्हणजे अमृतच; जाणून घ्या ‘हे’ आश्यर्यकारक फायदे )

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

लवंग तेल वापरल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. या तेलामध्ये असलेले गुणधर्म तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे तुम्ही संक्रमण आणि बॅक्टेरियाच्या समस्या टाळू शकता.

हृदय निरोगी ठेवते

हृदय निरोगी ठेवण्यासाठी लवंगाच्या तेलाचा वापर करा. हे कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाच्या समस्या दूर करून तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करू शकते.

ताण-तणाव चिंता होते दूर

लवंग तेलाचा उपयोग तणाव दूर करण्यासाठी, चिंता कमी करण्यासाठी आणि मानसिक थकवा कमी करण्यासाठी केला जातो. याचे सेवन केल्याने मन शांत राहते. कपाळावर वर्तुळाकार मालिशसाठी हे तेल वापरल्याने डोक शांत राहते. ताण दूर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या तेलाचा सुगंध मनासह डोक्याला आराम देतो. लवंग तेलाचे दोन ते तीन थेंब गरम पाण्यात टाका आणि वाफ घ्या, यामुळे ताण कमी होईल. लवंगाचे तेल आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर नक्कीच तज्ञाचा सल्ला घ्या.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Health benefits of clove oil pdb