Benefits Of Almonds In Summers : उन्हाळा सुरू झाला की सतत काही ना काही थंड प्यावेसे वाटते. मग तो लिंबाचा रस, उसाचा रस, अन्य फळांचे ज्यूस असो किंवा मग कोल्ड कॉफी. पण, बरेच जण दुग्धजन्य पदार्थ पिणे टाळतात, कारण काही जणांचे यामुळे पोट दुखते, तर कोणाला अगदी मळमळतंसुद्धा… त्यामुळे अनेक जण बदामाच्या दुधाचे सेवन करतात. उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांपैकी, बदामाचे दूध उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करण्यासाठी सर्वात योग्य, डेअरी-मुक्त आणि हायड्रेटिंग पेये ठरते. तृणधान्यांवर ओतून किंवा दुपारी थंडगार पेय म्हणून बदामाचे दूध पिऊ शकता.

उन्हाळ्यात बदामाचे दूध पिण्याचे फायदे (Drinking Almond Milk In Summer)

१. बदामाचे दूध व्हिटॅमिन ईने समृद्ध असते, जे सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते. बदामाच्या दुधात त्वचेचे संरक्षण करणारे गुणधर्म म्हणून ओळखले जाणारे अँटीऑक्सिडंट असतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने प्रकाशित केलेल्या २०१८ च्या संशोधनपत्रानुसार, त्वचेला हानी पोहोचवणाऱ्या पेशींना नुकसान पोहोचवणाऱ्या मुक्त रॅडिकल्सना निष्क्रिय करण्यात व्हिटॅमिन ई महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. बदामाच्या दुधात आढळणारे अँटीऑक्सिडंट्स अकाली वृद्धत्व आणि उन्हामुळे होणारा त्रास कमी करण्यासदेखील मदत करू शकतात.

२. कमी कॅलरीज, वजन व्यवस्थापनासाठी संतुलित आहार घेणे महत्त्वाचे असते. यासाठी बदामाचे दूध एक उपयुक्त पर्याय आहे. फॅट लॉस एक्सपर्ट अमन (@diet_dynamo_) यांच्या मते, २४० मिली बदामाच्या दुधात फक्त ३५-४० कॅलरीज असतात, जे गाईच्या दुधापेक्षा किंवा अनेक साखरयुक्त उन्हाळी पेयांपेक्षा खूपच कमी असतात. याचा अर्थ तुम्ही जास्त कॅलरीजची चिंता न करता आइस्ड कॉफी किंवा स्मूदीमध्ये बदामाचे दूध टाकून त्याचा आनंद घेऊ शकता.

३. आतड्यांच्या समस्यांसाठी जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ टाळत असाल, तर बदामाचे दूध हा आतड्यांसाठी अनुकूल पर्याय आहे. ते नैसर्गिकरित्या दुग्धशर्करा-मुक्त असल्याने, सेवन केल्यानंतर पोट फुगणे, पेटके येणे किंवा पचनक्रियेत अस्वस्थता येण्याचा धोका नसतो. उन्हाळ्यात, पचनसंस्था अधिक संवेदनशील होऊ शकते आणि बदामाचे दूध पोटासाठी आरामदायी पर्याय प्रदान करते.

४. हायड्रेटिंग आणि पोषक तत्वांनी समृद्ध उष्णतेमध्ये हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. यासाठी बदामाचे दूध तुम्हाला मदत करू शकते. बदामाचे दूध केवळ हायड्रेशन देत नाही तर यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चर (USDA) नुसार, बदामाच्या दुधात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई सारखे महत्त्वाचे पोषक घटकसुद्धा देतात. हे हाडांच्या बळकटीसाठी, रोगप्रतिकारक शक्तीला आणि त्वचेच्या आरोग्यासाठी योगदान देतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. बहुमुखी आणि नैसर्गिकरित्या ताजेतवाने बदामाचे दूध स्मूदीमध्ये मिसळता येते, तृणधान्यांमध्ये घालता येते किंवा आईस कॉफी आणि चहासाठीसुद्धा वापरले जाऊ शकते. त्याची क्रिमी टेक्चर कोणत्याही पदार्थाची चव वाढवते.