उष्णतेचा त्रास झाला की आपण वेगवेगळे उपाय करतो मात्र तुम्हाला माहितीये का उष्णतेचा त्रास होत असेल तर लस्सीचे सेवन केलं जातं. गोड लस्सी प्यायल्याने पचनसंस्था मजबूत होते आणि पोट निरोगी राहते. गोड लस्सीमध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या पोटातील बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीची समस्या सहज दूर करण्याचे काम करतात.गोड लस्सी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. कारण त्यात सोडियम, प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे पचनसंस्था मजबूत होण्याबरोबरच हाडेही मजबूत असतात. चला तर मग दह्याची लस्सीचे फायदे आणि लस्सी कशी बनवायची ते पाहूयात..
पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी
लस्सीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासोबतच पचनक्रिया मजबुत होण्यासाठीही मदत होते. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात बॅक्टेरिया असतात. जर तुम्हाला पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर लस्सी त्यावर गुणकारी ठरते.
अॅसिडीटीपासून सुटका होण्यासाठी
मसालेदार पदार्थ किंवा बाहेरी पदार्थ खाल्याने अॅसिडिटीच्या समस्येचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यामध्ये अॅसिडीटीची समस्येचा त्रास आणखी वाढतो. लस्सी यावर अत्यंत परिणामकारक ठरते. लस्सी थंड असते त्यामुळे अॅसिडिटी, अपचन यांसारख्या समस्यांवर फायदेशीर ठरते.
हाडांसाठी फायदेशीर
लस्सीमध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतं. ज्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी ही फायदेशीर ठरते. हाडांच्या समस्या दूर करण्यासाठी दररोज लस्सी पिणं फायदेशीर ठरतं.
ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी
लस्सी प्यायल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. अनेक संशोधनांमधून ही गोष्ट सिद्ध करण्यात आली आहे की, लस्सीमध्ये असलेलं पोटॅशिअम आणि रिबोफ्लेविन यांसारखी तत्व ब्लड प्रेशर नैसर्गिक पद्धतीने कंट्रोल करतात.
बटरस्कॉच लस्सी साहित्य
२ कप ताजे दही
१ कप मलईदार दूध
३ चमचे साखर,
काही काजूचे तुकडे
चिमूटभर काळे मीठ
१/२ कप बटर स्कॉच आइस्क्रीम
बटरस्कॉच लस्सी कृती
प्रथम दोन कप ताजे दही, एक कप मलईदार दूध, तीन चमचे साखर,
काही काजूचे तुकडे, चिमूटभर काळे मीठ आणि अर्धा कप बटर स्कॉच आइस्क्रीम घ्या.
नंतर मिक्सर जार घ्या आणि सर्व साहित्य घाला आणि एकदा मिसळा.
नंतर सर्व्हिंग ग्लासमध्ये फिरवून थंड-थंड थांडा-थांडा सर्व्ह करा.