मायग्रेन किंवा तीव्र डोकेदुखीचा त्रास हा वेगवगेळ्या व्यक्तीस विविध लक्षणांसोबत कमी-जास्त प्रमाणात जाणवतो. आहारातील बदल, वातावरणातील बदल अशा एक ना अनेक कारणांमुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. मायग्रेनच्या त्रासामुळे अनेकांना उलट्या होणे, चक्कर येणे, जास्त प्रकाशाचा त्रास सहन न होणे, अशक्तपणा येणे अशा समस्या उद्भवू शकतात. काही वेळा मायग्रेनचा अटॅक आल्यावर दोन तीन दिवस तीव्र डोके दुखीचा त्रास ही सहन करावा लागतो. अद्याप मायग्रेनवर कोणतेही उपचार नसले तरी काही औषधांच्या साह्याने डोकेदुखी कमी करून आराम करता येतो. याचबरोबर आपल्या आहारात बदल करणे देखील गरजेचं आहे. काही खाद्य पदार्थांमुळे मायग्रेनचा त्रास होतो. तर असेही काही खाद्यपदार्थ आहेत ज्याने मायग्रेनचा त्रास हा कमी होतो. चला तर मग जाणून घेऊयात मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांकडे दुर्लक्ष करू नये.

मासे :

रोजच्या आहारात मासे जरूर खावे. कारण यामध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड असते. यामुळे मासे खाल्ल्याने मायग्रेनच्या वेदना कमी होण्यास मदत होते.

काजू :

काजूमध्ये मॅग्नेशियम आणि पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात आढळतात. याशिवाय काजूमध्ये न्यूट्रिएंट्सची कमतरता नसते. तुम्ही रोजच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दिवसभरात कधीही काजू, बदाम व अक्रोडचे सेवन करू शकता. कारण याने मायग्रेनचा त्रास आटोक्यात येऊ शकतो.

हिरव्या भाज्यांचा समावेश :

आहारात तुम्ही हिरव्या पालेभाज्यांंचा समावेश करावा. खास करून पालेभाज्यांमध्ये पालक खावी कारण पालक मायग्रेनसाठी खूप फायदेशीर आहे. विशेषतः पालक हा फॉलिक अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन बी तसेच मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे. जो मायग्रेनचा त्रास कमी करून लढण्यासाठी उपयुक्त आहे.

भरपूर प्रमाणात पाणी प्यावे :

मायग्रेनचा त्रास सुरू झाल्यास स्वतःला हायड्रेड ठेवा. याने डोकेदुखी सहन करण्याची क्षमता मिळते. यासाठी दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.

अनियमित आहार :

अनेकदा कामाच्या व्यापात जेवणाकडे दुर्लक्ष होतं. उपाशीपोटी काम केल्यानं मायग्रेनचं दुखणं बळावू शकतं. त्यामुळं तुमच्या आहाराबरोबर झोपही पूर्ण होईल याकडे लक्ष द्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: या टिप्सचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमेली डॉक्टरचा सल्ला घ्या)