जगातील अनेक देशांमध्ये मांजर पाळण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. अमेरिकेतील सुमारे ८५ दशलक्ष लोक त्यांच्या घरात मांजरी पाळतात आणि त्यांच्यावर मुलांप्रमाणे प्रेम करतात. अशा लोकांना मांजर प्रेमी म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का की मांजरीचे संगोपन केल्याने मानवी आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो. आत्तापर्यंत अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की मांजर पाळल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका इतर लोकांच्या तुलनेत कमी असतो. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मांजरी देखील महत्वाची भूमिका बजावते, आज आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही धक्कादायक गोष्टी सांगणार आहोत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(विश्लेषण: पहिल्या हार्ट अटॅकआधी पुरुष व महिलांमध्ये दिसतात वेगवेगळी लक्षणे; वयानुसार कसा ओळखाल धोका?)

माणूस आणि मांजरीचे नाते हजारो वर्षे जुने आहे…

मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार, माणूस आणि मांजर यांच्यातील संबंध ९५०० वर्षांपेक्षा जुना आहे. माणूस आणि मांजर यांच्यातील संबंधाचा सर्वात जुना पुरावा ५३०० वर्षांपूर्वी चीनच्या क्वानहुकुन प्रांतातील एका कृषी गावात सापडला होता. इजिप्शियन लोक मांजरीला दैवी उर्जेचे प्रतीक मानत होते. पॅरिसमधील फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चच्या संचालिका डॉ. ईवा मारिया गीगल यांच्या म्हणण्यानुसार, मांजरींना लोकांनी अशासाठी पाळले होते जेणेकरून ते त्यांच्या धान्याभोवती फिरणारे उंदीर खाऊ शकतील. हळुहळु मांजरांनीही माणसांच्या आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेतलं आणि दोघांमधील नातं घट्ट होत गेलं.

(नक्की पाहा: बदाम भिजवून खाल्याने खरोखरच फायदा होतो की ही केवळ अफवा? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..)

मांजरीच्या मालकाला हृदयविकाराचा धोका कमी असतो?

सन २००८ मध्ये अमेरिकन स्ट्रोक असोसिएशनची आंतरराष्ट्रीय स्ट्रोक परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये एक रिसर्च सादर करण्यात आली, ज्यामध्ये संशोधकांनी सांगितले की, मांजरी पाळणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका इतर लोकांच्या तुलनेत सुमारे ३३% कमी होतो. मांजरी पाळणार्‍या लोकांचा तणाव आणि एंजाइटीची पातळी देखील कमी होते, ज्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. हा अभ्यास सुमारे १० वर्षे केला गेला आणि त्यात ४००० हून अधिक अमेरिकन लोकांचा समावेश होता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health news owning a cat can prevent heart attack problem know 9500 years old human and cat connection gps
First published on: 03-01-2023 at 14:11 IST