छातीत बॅक्टेरिया किंवा विषाणूमुळे संसर्ग होऊ शकतो. यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील सर्वात मोठी समस्या श्वासोच्छवासाची असू शकते. बहुतेकदा ब्राँकायटिस विषाणूमुळे हा संसर्ग होतो आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तो शरीरात वेगाने पसरतो. याचा धोका मुख्यतः वृद्ध, लहान मुले, धूम्रपान करणारे, गर्भवती महिला किंवा लठ्ठ लोकांमध्ये आढळतो.

छातीच्या संसर्गामध्ये, जास्त खोकला येऊन घशात कफ जमा झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. खोकल्याबरोबर उच्च ताप हे छातीच्या संसर्गाचे लक्षण असू शकते. छातीच्या संसर्गाची आणखी कोणती लक्षणे आहेत आणि याचे प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत हे जाणून घेऊया.

Breast Cancer : ब्रा घातल्याने स्तनाचा कर्करोगचा धोका वाढतो? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छातीच्या संसर्गाची लक्षणे

  • खोकल्यासह ओला कफ
  • बोलता बोलता घशात खवखवणे
  • ताप आणि डोकेदुखी
  • घशात अस्वस्थता आणि श्वास घेण्यास त्रास होणे.
  • छातीत सतत अस्वस्थता जाणवते
  • स्नायू आणि संपूर्ण शरीरात वेदना
  • सतत अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे
  • पिवळा आणि हिरवा कफ पडणे

छातीचा संसर्ग टाळण्यासाठी घरगुती उपाय

  • तुम्हाला ताप किंवा वेदना होत असल्यास, तुम्ही डॉक्टरांचा सल्ल्याने अँटीबैक्टीरियल औषध घेऊ शकता.
  • आपल्या शरीराला योग्यरित्या रिलॅक्स करा आणि शक्य तितकी विश्रांती घ्या.
  • घशातील कफ काढून टाकण्यासाठी ओटीसी डिकंजेस्टंटचा वापर केला जाऊ शकतो.
  • अधिकाधिक द्रव पदार्थांचे सेवन करा आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवा. यामुळे कफ घशात अडकणार नाही आणि श्वास घेणे सोपे होईल.
  • दिवसातून दोन ते तीन वेळा इनहेलर किंवा वाफ घ्या.
  • रात्री झोपताना सरळ झोपणे टाळा. असे केल्याने छातीत कफ जमा होऊ शकतो. झोपताना डोक्याखाली उशी ठेवू शकता.
  • घशात समस्या असल्यास कोमट पाण्यात मध आणि लिंबू प्यायल्याने आराम मिळतो.
  • धुम्रपान टाळा आणि अशा ठिकाणी जाऊ नका.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)